जाहिरात

Sleep Tourism: स्लीप टुरिझम म्हणजे काय? शांत झोप मिळवण्यासाठी लोक का करतायेत प्रवास, काय आहे ट्रेंड?

Sleep Tourism: स्लीप टुरिझम केवळ चैनीची बाब नाहीय तर निरोगी आरोग्यासाठी केली जाणारी मोठी गुंतवणूक म्हणू शकतो. आहार आणि व्यायामाइतकीच झोप देखील महत्त्वाची आहे, याचीच आठवण हा ट्रेंड प्रत्येकाला करुन देत आहे.

Sleep Tourism: स्लीप टुरिझम म्हणजे काय? शांत झोप मिळवण्यासाठी लोक का करतायेत प्रवास, काय आहे ट्रेंड?
"Sleep Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय आणि याचा फायदा काय आहे?"

What Is Sleep Tourism: दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतात, घडलेल्या कित्येक गोष्टींमुळे मानसिक त्रास होतो. डोक्यात विचारांचे चक्र सुरू राहते. मानसिक त्रास कालांतराने शरीरावरही दिसू लागतात. झोपेवरही वाईट परिणाम होतात. संपूर्ण रात्र या कुशीवरुन त्या कुशीवर हीच गोष्ट सुरू राहते, पण काही केल्या झोप लागत नाही. सकाळ होताच झोप पूर्ण झालीच नाही, असे अनेकांना वाटतं. हेच आताच्या लाइफस्टाइलचे सत्य आहे. रात्री उशीरापर्यंत मोबाइल-लॅपटॉपचा वापर करणे, कामाचा ताण यासह अन्य गोष्टींचा झोपेवर परिणाम होतोय. या परिस्थितीस लोक 'स्लीप एपिडेमिक' म्हणत आहेत. आठ तासांची गाढ झोप आताच्या काळात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट मानली जात आहे. याच शोधामुळे स्लीप टुरिझम हा नवा ट्रेंड उदयास आलाय. 

(नक्की वाचा: Sleep Time According To Age: वयोमानानुसार कोणत्या व्यक्तीने किती तास झोपावे, तुम्ही किती वेळ झोपता?)

Latest and Breaking News on NDTV

स्लीप टुरिझम म्हणजे काय? (Good Sleep Tips)

  • स्लीप टुरिझम म्हणजे जेथे तुमचे प्राधान्य केवळ चांगली झोप मिळेल तेथे प्रवास करावा. 
  • पूर्वी हॉटेलमध्ये केवळ आरामदायी पलंग उपलब्ध असायचे पण स्लीप टुरिझमच्या माध्यमातून संपूर्ण प्रवास तुमची झोप सुधारण्याच्या दृष्टीने डिझाइन केला जातो. 
  • आठवडाभर झोपेसाठी जागा उपलब्ध करुन दिल्या जातात. 
  • काही ठिकाणी वैद्यकीय कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते.  
  • काही ठिकाणी झोपेसाठी आवश्यक असणाऱ्या स्पा ट्रीटमेंटही मिळतात. 
Latest and Breaking News on NDTV

लोकांमध्ये का वाढतेय स्लीप टुरिझमची क्रेझ? (Sleep Tourism Trend)

  • पूर्वी लोक निरोगी आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामाची काळजी घेत होते. पण आता झोपेसही तितकेच महत्त्व दिलं जातंय. 
  • LocalCircles ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये 61 टक्के लोक सहा तासांहून कमी तास झोपतात. या पार्श्वभूमीवर स्लीप टुरिझममुळे लोक तणावापासून दूर होऊन स्वतःशी जोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.  

(नक्की वाचा: Better Sleep Tips: 5 मिनिटांत येईल गाढ झोप, झोपण्यापूर्वी दुधामध्ये चिमूटभर मिक्स करा ही पावडर)

Latest and Breaking News on NDTV

भारतमध्ये स्लीप टुरिझमचा अनुभव कुठे मिळू शकतो ? (Sleep Therapy Travel)

  • आनंदा इन द हिमालयाज, ऋषिकेश – योग निद्रा, शिरोधारा आणि मेडिटेशन थेरपीसाठी प्रसिद्ध आहे. 
  • आत्मंतन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी, पुणे – योग आणि स्पा ट्रीटमेंटद्वारे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळू शकते.  
  • स्वास्वरा, गोकर्णा – टेक-फ्री लाइफस्टाइल 
  • वन, देहरादून – साउंड हीलिंग, आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि जंगलनुमा आर्किटेक्चरचा अनुभव येथे मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com