How To Sleep Quickly: पुरेशा प्रमाणात झोपणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते. दिवसभरात शरीराची झालेली झीज झोपेदरम्यान भरुन निघते आणि मेंदूलाही आराम मिळतो. काही लोकांना रात्रीची झोप येत नाही तर काहींची रात्रीची झोप वारंवार मोडते. तुम्ही देखील यापैकी एखाद्या समस्येचा सामना करत असाल तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रसिद्ध योगगुरू हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी झोपेशी संबंधित माहिती शेअर केलीय.
रात्री झोप येत नसल्यास काय करावे?
व्हिडीओमध्ये योगगुरू हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, चांगली आणि गाढ झोप हवी असल्यास झोपण्याच्या सवयीकडे नीट लक्ष द्या.
डाव्या की उजव्या, कोणत्या कुशीवर झोपावे?
डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाव्या कुशीवर झोपल्यास चांगली झोप येते. यामुळे मेंदूला आराम मिळतो, श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत अडथळे येत नाही. शिवाय डाव्या कुशीवर झोपल्यास पचनप्रक्रियाही सुधारते.
(नक्की वाचा: Fatigue Causes: काही केल्या तुमचाही थकवा जात नाही का? डॉक्टरांनी सांगितली समस्येमागील 11 कारणे)
चांगली झोप मिळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या
चांगली झोप मिळावी, यासाठी योगगुरू हंसा यांनी काही टिप्सही शेअर केल्या आहेत.
- नियमित वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर झोपेतून उठावे.
- झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या वेळा पाळल्या तर शरीराचे झोपेचे घड्याळ व्यवस्थित सुरू राहते.
- रात्री झोपताना आरामदायी कपडे परिधान करावे. घट्ट कपड्यांमुळे अस्वस्थ वाटू शकते.
- झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाइल पाहणे टाळावे.
- योग आणि ध्यानधारणा करावी. बालासन, विपरीतकरणी मुद्रा यासारख्या योगासनांचा अभ्यास करावा. ज्यामुळे शरीराला आराम मिळेल.
- जड स्वरुपात जेवण केल्यानंतरही झोपेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकता.
- रात्री झोपण्यापूर्वी चहा-कॉफी पिणे टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )