
Bhai Dooj 2025 Shubh Muhurat: भाऊबहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्य आणि प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करते. यंदा भाऊबीज कधी आहे? भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
भाऊबीज 2025 कधी आहे? | Bhai Dooj 2025 Date | Bhaubeej Kadhi Ahe | When Is Bhai Dooj 2025
यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.
भाऊबीज 2025 तिथी | Bhai Dooj 2025 Tithi
कार्तिक शुद्ध द्वितीय तिथीस (Dwitiya Tithi Begins) 22 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 08:16 वाजता प्रारंभ होणार असून 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री (Dwitiya Tithi Ends) 10:46 वाजता तिथी समाप्त होईल.
भाऊबीज साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त | Bhai Dooj 2025 Tika Time |Bhaubeej Ovalanicha Shubh Muhurat | Bhai Dooj 2025 Tika Shubh Muhurat
23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारी दुपारी 01:32 वाजेपासून ते दुपारी 03:51 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या कालावधीदरम्यान भाऊबीज साजरी करू शकता.
- अभिजीत मुहूर्त सकाळी 11.59 वाजेपासून ते दुपारी 12.46 वाजेपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त दुपारी 2.18 वाजेपासून ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत आहे.
- निशिता मुहूर्त रात्री 11.50 वाजेपासून ते उत्तररात्री 12.48 (AM)(24 ऑक्टोबर) वाजेपर्यंत आहे.
भाऊबीज 2025 पूजा विधी | Bhai Dooj 2025 Pooja Vidhi
- भाऊबीजेच्या दिवशी आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करा.
- घरातील देवांची पूजा करावी.
- भावाला बसण्यासाठी स्वच्छ ठिकाणी पाट मांडावा, त्याभोवती रांगोळी काढावी.
- भावाच्या कपाळावर टिळा-अक्षता लावून औक्षण करून त्याला मिठाई भरावा.
- भावाच्या प्रगती, सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करा.
(नक्की वाचा: Happy Diwali 2025: दिव्यांचा सोहळा, लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे नशीब उजळो; दिवाळीच्या पाठवा खास शुभेच्छा)
भाऊबीज सणाची पौराणिक कथा | Bhai Dooj 2025 History
पौराणिक कथेनुसार, भाऊबीज सणाला यमद्वितीया असेही म्हणतात. भाऊबीजेची कहाणी सूर्यपुत्री यमुना आणि सूर्यपुत्र यम देवतेशी संबंधित आहे. यमुना देवीचा तिच्या भावावर खूप जीव होता आणि यम देवतेचंही त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम होते. यमुना देवींनी अनेकदा भावाला तिच्या घरी बोलावले, पण व्यस्त वेळापत्रकामुळे यम देवता आणि तिच्या भेटीमध्ये अडथळे निर्माण होत होते. एके दिवशी यमुनेचे आमंत्रण यमदेवतेने स्वीकारले आणि बहिणीला भेटण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
कथेनुसार यमुनेच्या घरी पोहोचताच ते खूप खूश झाले. ज्या दिवशी या दोघांची भेट झाली त्या दिवशी कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वितीया तिथी होती. यमुना देवीने भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे स्वागत केले आणि त्याच्यासाठी खास पक्वान्नांचा बेत आखला होता. बहीणने केलेल्या आदरातिथ्याने यमदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी बहिणीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने वर म्हणून मांगितले की, जेव्हा एखादी बहीण तिच्या भावाच्या कपाळी टिळा लावून त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करेल तेव्हा तुमच्या आशीर्वादाने तिचा भाऊ दीर्घायुष्यी होवो. या दिवसापासूनच भाऊबीज सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world