जाहिरात

Happy Diwali 2025: दिव्यांचा सोहळा, लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे नशीब उजळो; दिवाळीच्या पाठवा खास शुभेच्छा

Happy Diwali 2025 Wishes In Marathi: दीपावलीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना खास शुभेच्छा नक्की पाठवा.

Happy Diwali 2025: दिव्यांचा सोहळा, लक्ष्मीच्या आगमनाने तुमचे नशीब उजळो; दिवाळीच्या पाठवा खास शुभेच्छा
"Happy Diwali 2025 Wishes In Marathi: शुभ दीपावली शुभेच्छा!"
Canva

Happy Diwali 2025 Wishes In Marathi: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हणजे एकता, प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक. दिव्यांच्या प्रकाशामुळे अंधार दूर होतो, त्याच पद्धतीने आपल्या जीवनातून अज्ञान, वाईट गोष्टी, नकारात्मकता दूर होऊन केवळ सकारात्मकता, चांगल्या गोष्टी येवो; याची शिकवणही हा सण देतो. आताच्या डिजिटलच्या युगात सर्वजण एकमेकांना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देतात. एकमेकांपासून दूर असूनही केवळ एका मेसेजमुळे, व्हिडीओ कॉलद्वारेही संवाद सुकर पद्धतीने होऊ लागले आहेत. तुम्ही देखील दिवाळी सणानिमित्त प्रियजनांना मंगलमय शुभेच्छा पाठवा.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | शुभ दीपावली 2025 | शुभ दिवाळी 2025| Happy Diwali 2025 Wishes In Marathi| Shubh Deepawali 2025 Wishes In Marathi

1. उजळले आकाश दीपांच्या माळांनी 
गंध दरवळे सुवासिक फुलांनी 
तसंच उजळू दे आयुष्य तुझे
प्रेम, आनंद आणि सौख्याच्या लाटांनी
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. नकोस मागू सोने-नाणे
माग समृद्धी, सुख-शांतीचे दान
फुलो नात्यांचा गंध दरवळणारा 
दिवाळी साजरी होवो आनंदात
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali 2025

3. सणांच्या या सोनेरी क्षणी
मिळो तुम्हाला सुखाचा समुद्र 
संपत्ती, प्रेम, आरोग्य लाभो 
दिवाळीच्या तुम्हाला कोटी-कोटी शुभेच्छा!
शुभ दीपावली 2025!
Shubh Deepavali2025

4. रांगोळीत रंग भरणारे क्षण 
फुलांमध्ये मिसळले आनंद गंध
दिवाळीचे हे मंगल पर्व
तुमच्या आयुष्यात घडवो चमत्कार!
शुभ दिवाळी 2025!

5. साजरा होवो सण आनंदाचा
उजळू दे घर दिव्यांच्या उजेडात 
दिवाळीत फक्त आनंद नांदो
दु:ख, काळजी राहो दूर 
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

6. लक्ष्मी येवो दारी तुमच्या
तिच्या येण्याने घरामध्ये होवो भरभराट 
दिवाळीच्या शुभेच्छा अशा
ज्यांनी उजळावं आयुष्य
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 

7. झगमगाट असो दिव्यांचा 
गोडवा असो फराळाच्या ताटात
शुभेच्छा पाठवतो खास
दिवाळीला तुमच्या आयुष्यात असो सुवर्ण प्रकाश!
दिवाळीच्या शुभेच्छा!

8. रंग, गंध आणि प्रकाश
दिवाळीचे सुंदर क्षण
मनात राहो फक्त आनंद
उत्साहात साजरा करा सण
दिवाळीच्या शुभेच्छा!

9. जगभर झळकू दे नाव तुमचे
प्रगतीने भरू दे तुमच्या जीवनाचे पान
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर
मिळो तुम्हाला यशाचे दान
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. चंद्र-ताऱ्यांहून अधिक उजळो तुमचे नशीब 
लक्ष्मीचे पाऊल तुमच्या घरी येवो 
संपत्ती, सौख्य लाभो तुम्हाला 
दिवाळीचा आनंद सदैव लाभो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

11. नवीन स्वप्न, नवीन दिशा
नव्या संधी, नवा प्रकाश
दिवाळीचे हे नवे पर्व
घेऊन येवो फक्त आनंददायी क्षण

12. दिव्यांचा सोहळा, आनंदाचा वर्षाव
हसत खेळत भरो घरदार
तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी असो उत्सव
दिवाळीच्या कोटी शुभेच्छा खास!
Happy Diwali 2025

13. दिवाळी म्हणजे प्रकाशाची सरिता 
जीवाभावाच्या नात्यांची आपुलकी
प्रेम, आपुलकी, हर्षोल्हास
यांनी भरू दे तुमचे अंगण खास!

14. साजरी होवो तुमची दिवाळी अगदी खास
फुलो तुमच्या आयुष्यात आनंदाचा वास
संपत्ती, यश, प्रेम लाभो
दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा खास!

15. चैतन्याने भरून जावो दिवस 
प्रेमाने उजळो जीवनातील प्रत्येक क्षण 
दिवाळीच्या या मंगल दिवशी 
मिळो तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद खास!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

16. झगमगणाऱ्या दिव्यांतून
आशेची किरणे तुमच्या जीवनी येवो 
सदैव मिळतो राहो सुख-समृद्धी 
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा
Shubh Deepawali 2025

17. दिवाळीचा शुभ सण आला 
प्रकाशाचा दरवळ सर्वत्र पसरला
प्रेमाने भरलेले प्रत्येक क्षण
तुमच्या जीवनात असो असे कायम सुख
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

(नक्की वाचा: Happy Diwali 2025 Wishes: दिव्यांचा सण तुमच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणो, दिवाळी सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

18. फराळाचा गोडवा
नात्यांचा गंध
प्रकाशाचा दरवळ
आणि केवळ चैतन्याचं वातावरण
शुभ दिवाळी!

19. दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह
नात्यांत फुलो प्रेमाचे बंध
दिव्यांनी उजळू दे स्वप्न तुमचे
प्रत्येक्ष क्षणात मिळो तुम्हाला कायम गोडवा
शुभ दीपावली 2025!
Happy Diwali 2025

20. गुढी नाही पण दिवे आहेत
होळी नाही पण रंग आहेत
सणांचा राजा आला खास
दिवाळीच्या तुमच्यासाठी अनंत शुभेच्छा!
Happy Diwali 2025

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com