महाराष्ट्रासह 'भाऊबीज' सण विविध राज्यांमध्ये या नावांनी केला जातो साजरा

Bhaidooj 2024: भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. भारतातील विविधता आणि संस्कृतीमुळे प्रत्येक ठिकाणानूसार सणांची नावं थोडीफार बदलली असली तरी, त्या सणांचे अर्थ आणि महत्त्व तेच आहे. जाणून घेऊयात भारतातील विविध राज्यांमध्ये भाऊबीज सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bhaidooj 2024: भाऊबीज हा सण, रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला समर्पित आहे.  भाऊबीजच्या दिवशी भावाला औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी औक्षण केल्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना गोडधोड खाऊ घालून भेट देण्याचीही परंपरा आहे. महाराष्ट्रात जरी हा सण ‘भाऊबीज' या नावाने ओळखला जात असला, तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जाणून घेऊया भारतातील विविध राज्यांमध्ये भाऊबीज सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते. 

(नक्की वाचा: बहीणभावाच्या नात्याचा सोहळा, मेसेजद्वारे दादा-ताईला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा)

महाराष्ट्र
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात मराठी, कोकणी लोकांमध्ये हा सण भाऊबीज, भाईबीज किंवा भाव बीज नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते.बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.भाऊ बहीण एकमेकांना भेट देऊन, गोडाधोडाचे जेवण केले जाते आणि घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढली जाते. 

नेपाळ 
नेपाळमध्ये भाऊबीजेला ‘भाई टिका' असे म्हणतात .  नेपाळमध्ये, विजया दशमीनंतरचा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. तिहार सणाच्या पाचव्या दिवशी भाई टिका साजरा केला जातो . तिहार म्हणजे कपाळावर लावला जाणारा कुंकवाचा टिळा. नेपाळमध्ये या सणाला भावाच्या कपाळावर सप्तरंगी टिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात रंगांचा उभा टिका लावण्याची परंपरा आहे.

Advertisement

(नक्की वाचा: लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने सण करा साजरा, दिवाळीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा) 

बंगाल 
पश्चिम बंगालमध्ये काली पूजेच्या एक किंवा दोन दिवसांनंतर साजरा केल्या जाणाऱ्या सणाला भाई फोटा म्हणतात. या दिवशी बहिणी भावासाठी उपवास ठेवतात आणि भावाचे औक्षण करून उपवास सोडतात. 

Advertisement

उत्तर प्रदेश 
उत्तर प्रदेशमध्ये या सणाला ‘भाई दूज' असे म्हणतात. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून साखरेचे बत्तासे खाऊ घालते. उत्तर प्रदेशात भाऊबीजेला सुक खोबरं देण्याची परंपरा आहे.

बिहार 
बिहारमध्येही भाऊबीजला ‘भाई दूज' असे म्हणतात. बिहारमधील भाऊबीजेचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी बहीण-भाऊ एकमेकांची माफी मागतात.  त्यानंतर भावाचे औक्षण करून एकमेकांना मिठाई भरवली जाते.
 

Advertisement