Blanched Almond: सावधान! सालीसकट बदाम खाताय? उकडलेले बदाम खाल्ल्यास काय होईल? जाणून घ्या योग्य पद्धत आणि फायदे

Blanched Almonds Benefits: बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, पण उकडलेले बदाम खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Blanched Almonds Benefits: बदाम शिजवून खाल्ल्यास काय होते?"
Canva

Blanched Almonds Benefits And Recipe: बदामामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. काही लोक बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खातात तर काहीजण तुपात परतून बदामाचे सेवन करतात. पण तुम्ही कधी उकडलेले बदाम खाल्ले आहेत का? होय, उकडलेले बदाम म्हणजेच 'ब्लँच्ड बदाम' (Blanched Almonds) आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. उकडलेले बदाम पचायला अतिशय हलके असतात. तुम्हालाही तुमच्या आहारात काहीतरी नवीन आणि सुपर हेल्दी पदार्थाचा समावेश करायचा असेल तर उकडलेले बदाम आणि त्यापासून तयार केलेल्या रेसिपी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. 

उकडलेले बदाम

बदाम उकळून त्याची साल काढली जाते, त्यास ब्लँच्ड बदाम म्हणतात. साल काढल्यानंतर बदामाचा कडकपणा कमी होतो. शिवाय शिजवलेल्या बदामांची चवही बदलते. 

Advertisement

(नक्की वाचा: Gut Health: पोट स्वच्छ होत नाहीय? त्वचेवरही ग्लो नाहीय? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' ड्रिंक)

ब्लँच्ड बदामाचा वापर कोणत्या गोष्टीमध्ये केला जातो?

  • मिठाई
  • खीर
  • स्मूदीज

बदाम शिजवण्याची योग्य पद्धत 

  • सर्वात आधी एका भांड्यात पाणी चांगले उकळवून घ्या.
  • पाणी उकळू लागल्यावर त्यात मूठभर बदाम टाका आणि फक्त एक ते दोन मिनिटांसाठी तसेच राहू द्या.
  • आता गॅस बंद करा आणि बदाम गरम पाण्यातून काढून लगेचच अगदी थंड किंवा बर्फाच्या पाण्यात टाका.
  • थंड पाण्यात टाकताच बदामावरील साल आपोआप निघेल.  

उकडलेले बदाम आणि ओट्सची हेल्दी स्मूदी - (How To Make Blanched Almonds Oats Recipe)

साहित्य:

  • शिजवलेले बदाम - पाच ते सहा 
  • ओट्स - तीन चमचे
  • दूध - एक ग्लास
  • मध किंवा खजूर - चवीनुसार
  • केळ - अर्धे

कृती:

  • मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, भाजलेले ओट्स, दूध आणि गोडव्यासाठी थोडेसे मध किंवा एक खजूर मिक्स करा. 
  • मिश्रण एकदम गुळगुळीत (स्मूद) होईपर्यंत चांगले ब्लेंड करून घ्या. 
  • मिश्रण तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढा आणि वरून बदामाचे काप मिक्स करा. थंडगार स्मूदीचा आस्वाद घ्या.

(नक्की वाचा: Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा)

उकडलेले बदाम खाण्याचे फायदे - (Ukadlele Badam Khanyache Fayde)

  • बदामाची साल पचायला जड असते, तुलनेने शिजवलेले बदाम सहजरित्या पचतात. शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो. 
  • शिजलेल्या बदामामध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स (Healthy Fats), प्रोटीन आणि आवश्यक खनिजे असतात. यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते. 
  • बदामामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E) भरपूर प्रमाणात असते. शिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू सक्रिय राहतो आणि स्मरणशक्तीही चांगली होते.
  • शिजवलेल्या बदामातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषणतत्त्वांचा पुरवठा करतात. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)