जाहिरात

Tech News : डेटा शिवाय मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग, टीव्ही-ओटीटी पाहता येणार; काय आहे D2M तंत्रज्ञान?

D2M तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट मोबाईलवर कंटेंट उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा वापर कमी होईल आणि परिणामी, दूरसंचार कंपन्यांचे डेटा उत्पन्न घटू शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे.

Tech News : डेटा शिवाय मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग, टीव्ही-ओटीटी पाहता येणार; काय आहे D2M तंत्रज्ञान?

मोबाईल ब्रॉडबँड नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट मोबाईलवर व्हिडिओ, डेटा आणि ओटीटी सेवा मिळवण्याचे 'डायरेक्ट-टू-मोबाइल' (D2M) तंत्रज्ञान भारतात मोठी क्रांती घडवण्याची शक्यता आहे. प्रसार भारतीने सध्याच्या पायाभूत सुविधा आणि दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल टॉवर्सचा वापर करून हे अत्याधुनिक D2M तंत्रज्ञान उपकरणे देशभर तयार करण्याची योजना आखली आहे. यामुळे साध्या मोबाईल फोनमध्ये डेटा विनाच लाईव्ह कॉन्टेन्ट, ओटीटी स्ट्रीमिंक सारखा अनुभव बिनदिग्गत घेता येणार आहे. 

28,000 कोटींची गुंतवणूक आवश्यक

एका उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञाच्या अंदाजानुसार, देशभरात D2M नेटवर्क सुरू करण्यासाठी सुमारे 28,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आवश्यक असेल. ग्राहकांच्या वाढीनुसार ही गुंतवणूक पुढील टप्प्यात वाढवली जाऊ शकते. या सेवेसाठी प्रसार भारतीला देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करणे शक्य आहे.

D2M तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्कवर अवलंबून न राहता थेट मोबाईलवर कंटेंट उपलब्ध होईल. त्यामुळे डेटा वापर कमी होईल आणि परिणामी, दूरसंचार कंपन्यांचे डेटा उत्पन्न घटू शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे. यामुळे दूरसंचार कंपन्या D2M तंत्रज्ञानाविरुद्ध सावध भूमिका घेत आहेत आणि अशा सेवांसाठी बाजारभावाने स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. द इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केले आहेत.

(नक्की वाचा-  Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

6 महिन्यांत 19 शहरांमध्ये चाचण्या

D2M तंत्रज्ञानाच्या चाचण्या सध्या दिल्ली आणि बेंगळुरू येथे घेण्यात आल्या आहेत. पुढील 6 ते 9 महिन्यांत 19 शहरांमध्ये प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधांचा वापर करून व्यावसायिक चाचण्या सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतात आणले जाईल.

फीचर फोनची किंमत 2000 ते 2500 दरम्यान

माहिती आणि ब्रॉडकास्टिंग मंत्रालय (MIB) D2M तंत्रज्ञान (D2M Technology) आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता दोन फोन उत्पादक कंपन्या पुढे आल्याने प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.

फीचर फोनचे प्रोटो-टाईप तयार आहेत आणि देशभरात सेवा उपलब्ध झाल्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होऊ शकते, असं मत GTM & Services Business चे हेड गौतम धिंग्रा यांनी व्यक्त केले. लावा इंटरनॅशनल सीएमओ संजीव अग्रवाल यांनी म्हटलं की, फीचर फोनचे एकत्रीकरण करत आहोत आणि ते 2000-2200 च्या श्रेणीत सहा महिन्यांच्या कालावधीत फीचर फोन मॉडेल बाजारात आणण्यासाठी तयारी करत आहेत.

(नक्की वाचा-  पाहताच खटाखट पेमेंट होणार, हिंदीतून गप्पा मारता येणार; 1 डिसेंबरला लाँच होतोय जादूचा गॉगल)

D2M चा फायदा

आयआयटी-कानपूरने  2022 मध्ये या तंत्रज्ञानावर अभ्यास करून एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. संस्थेनुसार, D2M नेटवर्क सुरू झाल्यावर, युजर्सना महागड्या ब्रॉड-बँड नेटवर्कवर अवलंबून न राहता, नाममात्र निश्चित मासिक किमतीत अनलिमिटेड व्हिडिओ आणि डेटा कंटेंट मध्ये प्रवेश मिळू शकेल. या तंत्रज्ञानाचा मुख्य प्रस्ताव हा आहे की, लाइव्ह इव्हेंट्स  दरम्यान बफरिंग नसावा, OTT स्ट्रीमिंग दरम्यान कोणताही विलंब नसावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com