जाहिरात

Ragi Roti: नाचणीची पोळी रोज खाणे योग्य आहे का? डॉ. राजदा यांनी सांगितली कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

Ragi Nutritional Value: नाचणी रोज खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? एका नाचणीच्या भाकरीत किती कॅलरीज, प्रोटीन आणि कॅल्शियम असते तसेच कोणी नाचणी खाणे टाळावे, याबाबत आहारतज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घ्या.

Ragi Roti: नाचणीची पोळी रोज खाणे योग्य आहे का? डॉ. राजदा यांनी सांगितली कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती
"Ragi Nutritional Value: नाचणीची पोळी रोज खाल्ली तर काय होईल?"
Canva

Ragi Nutritional Value: वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नाचणीला (रागी) सुपरफूड मानले जाते. पण आज प्रश्न फायद्यांबाबत नाहीये तर प्रश्न असा आहे की, नाचणी रोज खाऊ शकतो का? तुमच्याही मनात हा प्रश्न येतो का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर या स्टोरीमध्ये फोर्टिस हॉस्पिटल, ग्रेटर नोएडाच्या सिनिअर क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डाएटिशियन कंचन खुराना यांनी तुमच्या सर्व शंका दूर केल्या आहेत.

नाचणी पौष्टिक का मानली जाते?

डाएटिशियन कंचन यांच्या मते, नाचणी हे असे एक पीक आहे, जे कमी पाण्यात आणि कठीण हवामानातही पिकवले जाऊ शकते. तसेच याच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांबाबत बोलायचे तर यात असलेले कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे मिनरल्स (खनिजे) खूप चांगल्या प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराला अनेक प्रकारे मदत करतात, जसे की ॲनिमिया, पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत मिळते.

रोज नाचणी खाणे योग्य आहे का?

अमृता रुग्णालय, फरिदाबाद येथील एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीज विभागाचे प्रमुख डॉ. निशांत राजदा यांचे म्हणणे आहे की, नाचणीला आपल्या संतुलित आहाराचा (बॅलन्स्ड डाएट) भाग बनवणे योग्य आहे, पण पूर्णपणे त्यावरच अवलंबून राहणे चुकीचे आहे. कोणतेही एक धान्य संपूर्ण आहाराची जागा घेऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने फक्त नाचणी खाल्ली आणि गहू, तांदूळ, डाळी, फळे आणि भाज्या कमी केल्या तर शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते. नाचणी हा कार्बोहायड्रेट्सचा एक स्रोत आहे, त्यामुळे त्याच्या प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाचणीसोबत इतर तृणधान्यांचाही आहारात समावेश करणे आणि पुरेशा प्रमाणात प्रोटीन तसेच भाज्या खाणे अधिक चांगले ठरेल.

एका मध्यम आकाराच्या नाचणीच्या (रागी) भाकरीत (सुमारे 40–50 ग्रॅम) सहसा 95–120 कॅलरीज असतात. भाकरीचा आकार, जाडी आणि त्यात वापरलेले तेल/तूप यानुसार कॅलरीज कमी किंवा जास्त होऊ शकतात.

नाचणीच्या भाकरीतील पोषक तत्त्वे (Nutrients)
1 नाचणीची भाकरी = सुमारे 100-120 कॅलरीज

  • नाचणीच्या भाकरीत किती प्रोटीन असते: 2–3 ग्रॅम
  • नाचणीच्या भाकरीत किती फायबर असते: 3–4 ग्रॅम
  • नाचणीच्या भाकरीत किती कार्ब्स असतात: 20–22 ग्रॅम
  • नाचणीच्या भाकरीत किती कॅल्शियम असते: 120–170 mg

वजन घटवण्यासाठी, डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी नाचणीची भाकरी हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

1 नाचणीच्या भाकरीचे (सुमारे 40–50 ग्रॅम) पोषण मूल्य | Ragi Nutritional Value

पोषक तत्त्व | प्रमाण (सुमारे)

  • कॅलरीज : 95–120 kcal
  • कार्बोहायड्रेट्स : 20–22 g
  • प्रोटीन : 2–3 g
  • फायबर : 3–4 g
  • फॅट्स : 0.5–1.5 g
  • कॅल्शियम :  120–170 mg
  • लोह : 1–2 mg
  • मॅग्नेशियम | 50–70 mg

[clearcals.com], [nutriscan.app]

नाचणीच्या भाकरीचे फायदे

  • कॅल्शियम : गव्हाच्या पोळीच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियम खूप जास्त असते. जे हाडे आणि दातांसाठी फायदेशीर असते.
  • फायबरचे : पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वजन कमी करण्यास मदत करू शकते.
  • डायबिटीज: फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असल्याने ब्लड शुगर हळूहळू वाढते.
  • ग्लुटेनची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे.

नाचणीची भाकरी कोणी खाऊ नये?

नाचणी सहसा आरोग्यासाठी सुरक्षित आणि पौष्टिक मानली जाते, पण:

  • ज्या लोकांना किडनी स्टोनचा (विशेषतः ऑक्सलेट स्टोन) त्रास आहे, त्यांना मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • ज्यांची पचनसंस्था जास्त प्रमाणात फायबर सहन करू शकत नाही, त्यांनी कमी प्रमाणापासून सुरुवात करावी.
  • कोणत्याही विशिष्ट आरोग्य समस्येमध्ये डॉक्टर किंवा डाएटिशियनचा सल्ला घेणे योग्य ठरते.

(हा एक सामान्य सल्ला आहे, वैयक्तिक वैद्यकीय सल्ला नाही.)

(नक्की वाचा: Sore Throat Remedies: पावसाळ्यात घसा बसलाय आणि खवखवतोय? आचार्य बालकृष्ण यांनी सांगितला सोपा घरगुती उपाय)

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार नाचणीचे स्वरूप "रूक्ष" म्हणजेच कोरडे मानले जाते. त्यामुळे नाचणीचे सेवन करताना पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक मानले जाते. पुरेसे पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीर हायड्रेटेड राहते.

(हा लेख अमृता हॉस्पिटल, फरीदाबादच्या एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीज विभागाचे प्रमुख डॉ. निशांत राजदा यांच्याशी केलेल्या बातचीतवर आधारित आहे)

नाचणीच्या सेवनाबाबत सातत्याने विचारले जाणारे प्रश्न FAQs 
1. एका नाचणीच्या भाकरीत किती कॅलरीज असतात?

एका मध्यम आकाराच्या नाचणीच्या भाकरीत (40-50 ग्रॅम) सुमारे 95–120 कॅलरीज असतात. भाकरीला तूप किंवा तेल लावल्यास कॅलरीज वाढू शकतात.

2. नाचणीमध्ये किती प्रोटीन असते?

नाचणीच्या पिठात प्रति 100 ग्रॅम सुमारे 7–7.5 ग्रॅम प्रोटीन आढळते. एका सामान्य नाचणीच्या भाकरीतून सुमारे 2–3ग्रॅम प्रोटीन मिळते.

(नक्की वाचा: Benefits Of Squeezing Lemon On Food: तुम्हालाही खाद्यपदार्थांवर लिंबू पिळून खाण्याची सवय आहे? शरीरावर काय होतो परिणाम? वाचा)

3. नाचणी वजन कमी करण्यास मदत करते का?

होय, नाचणीमध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी होते. याच कारणामुळे याचा वजन नियंत्रण आणि संतुलित आहारात समावेश केला जातो.

4. डायबिटीज असलेले रुग्ण रोज नाचणी खाऊ शकतात का?

नाचणीचा ग्लायसेमिक प्रभाव आटोक्यात मानला जातो आणि त्यात फायबरही चांगले असते. म्हणूनच याला डायबिटीज फ्रेंडली आहाराचा भाग मानले जाते. तरीही प्रमाण, एकूण आहार आणि वैयक्तिक ब्लड शुगर कंट्रोलनुसार याचे सेवन केले पाहिजे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com