Chandra Grahan 2026: यंदा 3 मार्च 2026 रोजी होलिका दहनाच्या दिवशी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे, याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा (Falgun Purnima 2026) देखील आहे. धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'सत्यनारायण पूजा' या दिवशी करावी की नाही, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. शास्त्रानुसार ग्रहणाचा सुतक काळ 9 तास आधी सुरू होत असल्याने या काळात शुभ कार्ये वर्ज्य मानली जातात. पण ग्रहण संपल्यानंतर पौर्णिमेची तिथी लक्षात घेता पूजा करावी का? उपवासाचे नियम, प्रसादाची योग्य वेळ आणि पूजेचे शास्त्रशुद्ध नियोजन कसे करावे, याबाबत ज्योतिषाचार्य श्रीकेतन कुलकर्णी यांनी दिलेली माहिती सविस्तर जाणून घ्या...
3 मार्च चंद्रग्रहण आणि पौर्णिमा
सत्यनारायण पूजन कधी करावे? उपवास आणि प्रसादाची योग्य वेळ काय?
- या वर्षी 3 मार्च रोजी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे.
- चंद्रग्रहणाच्या दिवशी पूजन करताना काही विशेष नियम पाळणे आवश्यक असते.
चंद्रग्रहणाच्या दिवशी काय लक्षात ठेवावे?
सुतक काळ
- चंद्रग्रहणाच्या साधारण 9 तास आधी सुतक सुरू होते.
- सुतक काळात नवीन शुभकार्य, स्वयंपाक, पूजन टाळावे.
सत्यनारायण पूजन कधी करावे?
पर्याय 1: ग्रहण संपल्यानंतर स्नान करून, घर शुद्ध करून संध्याकाळी किंवा रात्री पूजन करावे.
पर्याय 2: जर शक्य नसेल तर पुढील दिवशी (4 मार्च) शुद्ध पौर्णिमेच्या तिथीत पूजन करणे अधिक शुभ मानले जाते.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: धूलिवंदनाला चंद्रग्रहण, आकाशात पाहणं शुभ की अशुभ? ग्रहण पाहिल्यास काय होईल? ज्योतिषाचार्यांची मोठी माहिती)
प्रसाद कधी करावा?
- सुतक सुरू होण्यापूर्वी बनवलेला प्रसाद ग्रहणकाळात सेवन करू नये.
- ग्रहण संपल्यानंतर स्नान करून ताजा प्रसाद बनवावा.
- प्रसादात तुळशीपत्र ठेवणे शुभ मानले जाते.
- ग्रहणाच्या दिवशी शक्य असल्यास सकाळपासून उपवास ठेवावा.
- ग्रहण संपल्यानंतर स्नान करून पूजन करून मगच उपवास सोडावा.
- मंत्रजप, नामस्मरण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)
विशेष सूचना
- गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी.
- ग्रहणकाळात देवमूर्ती झाकून ठेवाव्या.
- ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे.
सत्यनारायण पूजन हे श्रद्धा आणि शुद्धतेने केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
ग्रहणानंतर केलेले पूजन अधिक फलदायी मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)