- 3 मार्च रोजी भारतात खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.
- चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू होणार आहे.
- ग्रहणाच्या मुख्य वेधकाळात बाल, वृद्ध, अशक्त, रोगी आणि गर्भवती महिलांनी सावधगिरी बाळगावी, असे म्हणतात.
Chandra Grahan 2026: होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी चंद्रग्रहण असणार आहे. याच दिवशी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी देखील आहे. चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्याने सुतक काळाच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे. चंद्रग्रहण किती वाजता सुरू होऊन किती वाजता समाप्त होणार आहे? सुतक काळ यासह अन्य माहिती सविस्तर जाणून घेऊया...
सोशल मीडियावरील "Shri Swami Samarth" या हँडलवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी असणार आहे, हे ग्रहण भारतातून दृश्यमान असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी 3.20 वाजेपासून ते संध्याकाळी 6.47 वाजेपर्यंत राहील, हे ग्रहण आशिया ऑस्ट्रेलिया पॅसिफिक बेटे आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतून दिसणार आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्टिका या प्रदेशात खग्रास चंद्रग्रहण दिसेल.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, काय टाळावे? ग्रहणाचा वेधकाळ, जाणून घ्या दाते पंचांगानुसार माहिती)
चंद्रग्रहणाचा वेध काळ | चंद्रग्रहणाचा सुतक काळ | Chandra Grahan 2026 Sutak Kaal | Chandra Grahan 2026 Vedh Kaal | Lunar Eclipse 2026 Sutak Kaal
चंद्रग्रहणाचा सुतक काळ सकाळी 6.20 वाजता सुरू होणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6.48 वाजेपर्यंत ग्रहणाचा वेध काळ पाळावा.
चंद्रग्रहणाच्या वेध काळामध्ये काय करणे टाळावे? | Chandra Grahan 2026 India Timings: Do's and Don'ts | Chandra Grahan 2026 Maharashtra Timings
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे ग्रहणाचे वेध 3 मार्च 2026च्या सूर्योदयापासून सुरू होतात. पण बाल, वृद्ध, अशक्त, रोगी आणि गर्भवती महिलांनी दुपारी 2.15 वाजेपासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6.47 वाजेपर्यंतच फक्त ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. ग्रहणाच्या मुख्य वेधकाळामध्ये भोजन आणि जलपान करू नये. ग्रहणाचा जो मुख्य पर्वकाल असतो, ते म्हणजे चंद्रोदय ते मोक्ष काळामध्ये भोजन, जलपान, मैथुन आणि अभ्यंगस्नानासारखी कृत्य करू नये, असं सांगितलंय. महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये चंद्रोदय किती वाजता होणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...
(नक्की वाचा: Holi 2026 News: घरच्या घरी होलिका पूजन कसे करावे? पूजा साहित्य-विधी, संकल्प, राखेच्या उपयोगापर्यंत वाचा संपूर्ण माहिती)
पुणे, मुंबईसह राज्यातील 35 जिल्ह्यातील चंद्रग्रहण किती वेळ असणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
- अहिल्यानगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.37 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- अकोला : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- अमरावती : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.24 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- छत्रपती संभाजीनगर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.34 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- बीड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- भंडारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.16 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- बुलडाणा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- चंद्रपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- धुळे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.36 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- गडचिरोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.15 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- गोंदिया : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.13 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- हिंगोली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- जळगाव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- जालना : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- कोल्हापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.40 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- लातूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- मुंबई : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नागपूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नांदेड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नंदुरबार : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.38 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- नाशिक : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- धाराशिव : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- पालघर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- परभणी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.29 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- पुणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- रायगड : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- रत्नागिरी : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सांगली : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सातारा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सिंधुदुर्ग : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.43 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- सोलापूर : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- ठाणे : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- वर्धा : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.20 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- वाशिम : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
- यवतमाळ : चंद्रग्रहण संध्याकाळी 6.22 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world