Chaturmas 2026 Date: दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मासाचा समारोप देवप्रबोधिनी (कार्तिकी) एकादशीला होतो. धार्मिक मान्यतांनुसार, देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरात विश्राम करण्यासाठी जातात, या दरम्यान सृष्टीचा कारभार भगवान महादेव सांभाळतात. भगवान विष्णू देवउठनी (कार्तिकी) एकादशीपर्यंत विश्राम करतात, याच कालावधीस 'चातुर्मास' म्हटले जाते. चातुर्मासामध्ये लग्नासह सर्वच शुभ आणि मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. यंदा चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे आणि या काळात कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे?| Chaturmas 2026 Start Date And End Date
वैदिक पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात 25 जुलैपासून होणार आहे आणि समाप्ती 20 नोव्हेंबर रोजी होईल. या कालावधीत सर्व प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्यांवर बंदी असते; पण या काळात जप, तप आणि दानधर्म केल्यास त्याचे अनेक पटीने अधिक फळ मिळते.
(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीची योग्य तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या)
चातुर्मासाचे नियम
1. सात्विक जीवनशैली: चातुर्मासाचा काळ पावसाळ्याशी जोडलेला असतो आणि या दरम्यान वातावरणातील दमटपणा वाढतो. तसेच संसर्ग आणि आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. अशा परिस्थितीत चातुर्मासाच्या काळात नेहमी सात्विक अन्नाचेच सेवन करावे आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे.
2. मंगल कार्य वर्ज्य: चातुर्मासाच्या काळात लग्नकार्य, गृहप्रवेश यासह अन्य कोणत्याही मंगल आणि शुभ कार्य वर्ज्य मानले जातात. तसेच या काळात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये. या व्यतिरिक्त या चार महिन्यांत झाडे किंवा वनस्पती कापणे देखील टाळावे.
(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2026: देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा कशी करावी? काय करावे आणि काय टाळावे? वाचा नियम)
3. नामस्मरण आणि चिंतन: चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचे जास्तीत जास्त ध्यान - स्मरण करावे. तुम्ही या काळात दररोज 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'ॐ नमः शिवाय' या मंत्रांचा जप करू शकता.
4.तामसिक आहार टाळा: चातुर्मासाच्या काळात मांस, मद्य, कांदा आणि लसूण यासारख्या तामसिक अन्नपदार्थांचे सेवन करू नये.
देव झोपले म्हणून चातुर्मास अशुभ? ऐका गुरुजी निनाद कुलकर्णी काय म्हणाले?
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world