जाहिरात

Saree Wholesale Market: 150 रुपयात सिल्क साडी, मुंबईसह या 3 बाजारात मिळतात सर्वात स्वस्त साड्या

Saree Wholesale Market: भारतात स्वस्त आणि दर्जेदार साडी कोठे मिळते? दिल्ली, कोलकाता आणि मुंबईतील या 3 प्रसिद्ध होलसेल मार्केटबद्दल जाणून घ्या, जिथे 150 रुपयांपासून साड्यांचे कलेक्शन उपलब्ध आहे.

Saree Wholesale Market: 150 रुपयात सिल्क साडी, मुंबईसह या 3 बाजारात मिळतात सर्वात स्वस्त साड्या
"Mangaldas market Mumbai: साडीचे प्रसिद्ध मार्केट"
Canva

Saree Wholesale Market: भारतामध्ये सर्वात स्वस्त साडी कुठे मिळते, याचा शोध तुम्ही घेत असाल तर दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथील 3 प्रसिद्ध बाजारपेठा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहेत. येथे 150 रुपयांपेक्षाही कमी किमतीत सिल्क, कॉटन आणि डेली-वेअर साड्या मिळतात. जर तुम्ही कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या साड्या विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. या लेखाद्वारे आम्ही अशा काही बाजारांची यादी शेअर करत आहोत जे देशभरात प्रसिद्ध आहेत. जिथे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत, तरीही कलेक्शन इतके अप्रतिम असेल की तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

1. मंगलदास मार्केट, मुंबई – होलसेल साडी मार्केट

जॉर्जेट, सिल्क, कॉटन, बनारसी, प्रिंटेड, ऑफिस वेअर किंवा लग्नाच्या साड्या अशा 20 ते 30  प्रकारच्या साड्या एकाच गल्लीत पाहायला मिळतात. या मार्केटमध्ये दुकानदार नेहमी नवीन डिझाइन्स ठेवतात, त्यामुळे इथून खरेदी करणारे ग्राहक कधीही निराश होत नाहीत.
बंद: रविवार
वेळ: सकाळी 10 किंवा 11 वाजेपासून मार्केट सुरू होते. 

sabse sasti saree kaha milti hai, cheap saree market in india, wholesale saree market,

Photo Credit: Pexels

2. चांदनी चौक, दिल्ली – सर्वात स्वस्त साडी मार्केट 

दिल्लीचे चांदनी चौक हे ठिकाण फक्त खाऊ गल्लीसाठीच नाही, तर कपड्यांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. बनारसी, सिल्क, कॉटनपासून ते डिझायनर साड्यांपर्यंत सर्व काही येथे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळते. येथे साड्यांच्या किमती 500 रुपयांपासून सुरू होतात.
बंद: रविवार
वेळ: सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 8-9 वाजेपर्यंत मार्केट सुरू असते. 
कसे पोहोचाल: सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन चांदनी चौक आहे.

3. बुर्रा बाजार, कोलकाता – होलसेल स्वस्त साडी मार्केट

येथील शेकडो दुकानांमध्ये कॉटन, सिल्क, हँडलूम, सिंथेटिक, बांधणी, पार्टी-वेअर आणि लग्नाच्या साड्या होलसेल दरात मिळतात. जर तुम्ही 150 रुपये ते 300 रुपयांच्या दरम्यान डेली-वेअर साड्या घेण्याचा विचार करत असाल, तर हे मार्केट सर्वोत्तम आहे.
बंद: रविवार
वेळ: सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे.
कसे पोहोचाल: सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन महात्मा गांधी रोड आहे.

FAQs 
1. भारतात सर्वात स्वस्त साडी कुठे मिळते?

- भारतात सर्वात स्वस्त साड्या दिल्लीचे चांदनी चौक, कोलकाताचे बुर्रा बाजार आणि मुंबईचे मंगलदास मार्केटमध्ये मिळतात.

2. 150 रुपयांत चांगली साडी मिळू शकते का?

- हो, होलसेल मार्केटमध्ये 150 ते 300 रुपयांच्या दरम्यान डेली-वेअर आणि सिल्क पॅटर्न साड्या सहज मिळतात.

3. होलसेल साडी खरेदीसाठी कोणते बाजार सर्वोत्तम आहे?

- बुर्रा बाजार (कोलकाता) आणि मंगलदास मार्केट (मुंबई) होलसेल साड्यांसाठी सर्वात प्रसिद्ध आहेत.

4. दिल्लीत सर्वात स्वस्त साडी बाजार कुठे आहे?

- दिल्लीमध्ये चांदनी चौक हे सर्वात स्वस्त आणि प्रसिद्ध साडी मार्केट आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com