Chiku In English: चिकूचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून मोठी माणसंदेखील हे फळ आवडीने खातात. चिकू जेवढं चविष्ट आहे, तितकंच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पोटाचं आरोग्य असो वा त्वचा, कमकुवत हाडं असो वा पचनशक्ती... चिकूमुळे हे आजार दूर राखण्यास मदत होते. हे तर झालं त्याच्या फायद्याविषयी, मात्र चिकूला इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का?
चिकूला इंग्रजीत काय म्हणतात?
चिकूला इंग्रजीत 'Sapodilla' सपोडिला किंवा 'SAPOTA' म्हणजेच सपोटा म्हटलं जातं.
नक्की वाचा - High Blood Sugar : रक्तातील साखर का वाढते? केवळ गोड नाही ही 4 कारणंही आहेत जबाबदार
चिकूचं सेवन कसं कराल?
- चिकू स्वच्छ धुवून खा.
- शेक किंवा स्मूदी
- फ्रूट सॅलेड
- आईस्क्रिम किंवा कस्टर्ड
चिकू खाण्याचे ६ महत्त्वाचे फायदे...
पचन - चिकूमधील फायबर पचनासाठी फायदेशीर असतं. चिकूमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आतड्यांची स्वच्छता करण्यात चिकूची मदत होते. ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.
त्वचा - चिकूमधील विटॅमिन ई त्वचेला हायड्रेट ठेवतं आणि नैसर्गिक चमक आणण्यास मदत मिळते. नियमितपणे चिकू खाल्ल्यास त्वचेशी संबंधित त्रासातून दिलासा मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती - चिकू विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने भरपूर असतं. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास यामुळे मदत मिळते. ज्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल संक्रमणापासून बचाव होतो.
हृदय - चिकूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात. जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तणाव - चिकूच्या सेवनाने मानसिक आरोग्य सुधारते आणि मनःस्थिती चांगली होते.
हाडे - चिकूमध्ये आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी चिकूचे सेवन केले जाऊ शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)