झोपेत नाकात शिरले झुरळ आणि श्वसननलिकेत अडकले, यानंतर जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही

झोपेत असलेल्या व्यक्तीला आपल्या नाकामध्ये काही फिरत असल्याचे जाणवू लागले. यानंतर त्याला खोकला येऊ लागला, पण घशात अडकलेली गोष्ट तोंडावाटे बाहेर येत नव्हती. मग काय जे घडले ते भयंकर....

Advertisement
Read Time: 2 mins

Cockroach Stuck In Throat: चीनमधील एका 58 वर्षीय व्यक्तीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली. झोपेमध्ये या व्यक्तीच्या नाकामध्ये झुरळ शिरले आणि श्वसननलिकेमध्ये जाऊन अडकले. जेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा तो अस्वस्थ झाला. नाकामध्ये शिरलेले झुरळ घशाच्या भागात येत असल्याचेही त्याला जाणवत होते आणि यामुळे त्याला खोकल्याची समस्या सुरू झाली. पण काही केल्या झुरळ बाहेर पडेना.

स्थानिक चिनी न्यूज आउटलेटनुसार, त्यावेळेस नेमके काय घडले हे त्याला समजलेच नव्हते. थोड्या वेळाने तो पुन्हा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्यानं घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि दैनंदिन कामामध्ये तो व्यस्त झाला. पण तीन दिवसांनंतर त्याच्या लक्षात आले की त्याच्या श्वासाला अतिशय घाणेरडा वास येत होता. दात घासले आणि तोंडाची स्वच्छता राखल्यानंतरही दुर्गंधीची समस्या काही केल्या कमी होत नव्हती. त्यांच्या थुंकीचा रंग देखील बदलला होता. अखेर त्याने डॉक्टरांना संपर्क साधला. 

(नक्की वाचा: Job Interview Tips : मुलाखतीदरम्यान या चुका टाळल्यास तुमची नोकरी पक्की समजा!)

डॉक्टरांमुळे समोर आली धक्कादायक घटना

चीनच्या हैनान प्रांतातील हायकोउ येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने हैनान रुग्णालयात जाऊन ईएनटी तज्ज्ञाकडून तपासणी करून घेतली. येथे तपासणीदरम्यान श्वसनमार्गाच्या वरील भागामध्ये काहीही असामान्य आढळले नाही. पण समस्या गंभीर असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला डॉ. लिन लिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. डॉ. लिन यांनी त्याच्या छातीचे सीटी स्कॅन केले, ज्यामध्ये फुफ्फुसाच्या मागील बाजूस बेसल सेगमेंटमध्ये त्यांना एक गोष्ट आढळली, ज्याद्वारे तेथे बाहेरील गोष्ट अडकल्याचे स्पष्ट झाले. 

(नक्की वाचा: Male Y Chromosome : आता खरंच मुलांचा जन्म होणार नाही? रीसर्चमधील धक्कादायक माहिती)

श्वसननलिकेतून काढले झुरळ 

संबंधित व्यक्तीला या प्रकरणात तज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपी टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला. डॉ. लिन यांनी आउटलेटला दिलेल्या माहितीनुसार, "प्रक्रियेदरम्यान मला ब्रॉन्कसमध्ये पंख असलेली एखादी गोष्ट स्पष्टपणे दिसली. बाहेरून शरीराच्या आतमध्ये गेलेल्या या गोष्टीवर कफ जमा झाला होता. कफ काढल्यानंतर ही वस्तू झुरळ असल्याचे आढळले. यानंतर काळजीपूर्वक श्वसननलिकेतून झुरळ बाहेर काढण्यात आले आणि शरीराचा तो भाग देखील पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. रुग्णाच्या तोंडाला येणारी दुर्गंधीची समस्या लवकरच दूर झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्जही देण्यात आला.

(नक्की वाचा: Diabetes and Sugar Level : किती असावी शुगर लेव्हल ? वाचा, कोणती टेस्ट आहे सर्वोत्तम)

डॉक्टरांनी दिला हा सल्ला 

डॉ. लिन यांनी सांगितले की, श्वसननलिकेमध्ये काहीतरी अडकल्याचे जाणीव होत असल्यास संबंधित व्यक्तीने तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.