तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे खरोखरच फायदेशीर आहे का? जाणून घ्या सर्व माहिती

तांब्याच्या भांड्यात कधीही दूध, दही किंवा लिंबूपाणी यांसारखे आंबट पदार्थ ठेवू नका.

जाहिरात
Read Time: 2 mins

आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाण्याला 'ताम्रजल' म्हटले जाते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. मात्र, अयोग्य पद्धतीने किंवा अतिप्रमाणात तांब्याचे पाणी पिणे शरीरासाठी, विशेषतः किडनीसाठी घातक ठरू शकते. रात्रभर किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्याला 'उषा पान' म्हणतात. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) सुधारते. वजन कमी करण्यास मदत होते. 

तांब्यातील गुणधर्म रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. सामान्य लोकांसाठी तांब्याचे पाणी सुरक्षित असले तरी, ज्यांना किडनीचे गंभीर विकार आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे पाणी पिऊ नये. शरीरात कॉपरचे (तांबे) प्रमाण वाढल्यास किडनी आणि यकृतावर (Liver) ताण येऊ शकतो. तसेच, पित्ताचा त्रास असलेल्यांनी आणि उन्हाळ्यात याचे अतिसेवन टाळावे. 

Advertisement

नक्की वाचा - Unique Holi: येथे रंगांनी नाही तर 'राखे'ने खेळतात होळी! वाचा 'या' प्रसिद्ध मंदिराची अजब परंपरा

तांब्याच्या भांड्यात कधीही दूध, दही किंवा लिंबूपाणी यांसारखे आंबट पदार्थ ठेवू नका. कारण त्याचे विषबाधेत रूपांतर होऊ शकते. तांब्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी पाणी किमान 8 ते 12 तास त्या भांड्यात असणे आवश्यक आहे. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी ते प्या. पण लक्षात ठेवा, 15 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेले पाणी पिणे टाळावे, कारण त्याची चव आणि गुणधर्म बिघडू शकतात.

नक्की वाचा - Health Tips: झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाल्ल्यास कोणते आजार होतात? जाणून घ्या A TO Z माहिती

पाणी पिण्यासाठी तांबे सर्वोत्तम मानले जाते कारण ते वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित करते. याशिवाय मातीचे माठ हा देखील एक नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळावा. ज्यांना पचनाची समस्या आहे, त्यांनी सकाळी उठल्यावर तांब्याचे कोमट पाणी प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चकाकी येते.

नक्की वाचा - घरीच तयार करा शुद्ध अन् सुगंधी खोबरेल तेल! सुक्या नारळाचा असा करा वापर, पाहा 'ही' सोपी ट्रिक