- रामलिंगेश्वर कामण्णा मंदिरात होळीचा सण पाच दिवसांच्या कालावधीत राखेने साजरा केला जातो
- या मंदिरात भगवान शिव आणि कामदेव यांच्या प्रतिमा एकत्र असल्याने होळीची पौराणिक कथा महत्त्वाची आणि अनोखी आहे
- कामदेवाने महादेवांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाने तिसरा डोळा उघडून त्यांना भस्म केले होते
Unique Five-Day Holi Festival: भारतात होळीचा सण विविध पद्धतींनी साजरा केला जातो. उत्तर भारतात जिथे होलिका दहन आणि रंगांना महत्त्व आहे, तिथे दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटकातील रामलिंगेश्वर कामण्णा मंदिरात हा सण भगवान शिव आणि कामदेव यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. या मंदिरात रंगांऐवजी राखेने होळी खेळली जाते. जी मानवी अहंकाराच्या नाशाचे प्रतीक मानली जाते. पाच दिवस हा सण चालतो. यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक ही इथे येत असतात. हा होळी सण सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र असतो.
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील गाभारा. भारतभरात हे कदाचित एकमेव मंदिर असेल जिथे भगवान शिव आणि कामदेव यांची प्रतिमा एकत्र आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा कामदेवाने महादेवांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवाने तिसरा डोळा उघडून त्यांना भस्म केले होते. कामदेवाचा गर्व हरण झाल्याची ही आठवण म्हणून येथे होळी साजरी केली जाते. ही होळी रंगाने नाही तर राखेने खेळली जाते. त्यामुळे इतर होळी पेक्षा ती वेगळी ठरते.
येथे होळीचा उत्सव संपूर्ण 5 दिवस चालतो. या काळात भक्त राखेला कपाळावर लावून अहंकाराचा त्याग करतात. ज्या दांपत्यांना अपत्यप्राप्तीची ओढ आहे, ते या मंदिरात येऊन देवाला 'चांदीचा पाळणा' अर्पण करतात, अशी येथील श्रद्धा आहे. यंदा 4 मार्च रोजी होणाऱ्या होळीनिमित्त या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. अनेकांची मोठी श्रद्धा असते. त्यामुळे इथं या काळात मोठ्या प्रमाणात चांगीचा पाळणा देवाला अर्पण केला जातो.
या 5 दिवसांच्या उत्सवात मंदिर रोषणाईने न्हाऊन निघते. अनेक भाविक येथे चांदीचा पाळणा अर्पण करण्यासाठी येतात. विशेषतः संतान सुखासाठी ही प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जर तुम्हाला या होळीला काहीतरी वेगळं अनुभवायचं असेल, तर दक्षिण भारतातील या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या. इथली होळी तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देणारी ठरेल. उत्तर भारता पेक्षा ही होळी फारच वेगळी आणि युनिक मानली जाते.
धार्मिक ग्रंथांनुसार, कामदेवाला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. तो मोडून काढण्यासाठी शिवाने त्याला भस्म केले. याच कारणामुळे येथे राखेने होळी खेळली जाते. अपत्यप्राप्तीची कामना करणारे जोडपे येथे चांदीचा झूला अर्पण करतात. ही यात्रा भाविकांना केवळ धार्मिक समाधानच देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनही प्रदान करते. त्यामुळे या होळीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world