जाहिरात

धक्कादायक! समुद्रातून आलेलं ते संकट तुमच्या डोळ्यांची दृष्टी हिरावून घेऊ शकतं, या VIRUSने जगाची वाढवली चिंता

Covert Mortality Nodavirus: जर तुम्हाला सी-फुड खायला आवडत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. समुद्रातील एक जीव थेट माणसाच्या डोळ्यांवर करतोय हल्ला.

धक्कादायक! समुद्रातून आलेलं ते संकट तुमच्या डोळ्यांची दृष्टी हिरावून घेऊ शकतं, या VIRUSने जगाची वाढवली चिंता
"Covert Mortality Nodavirus: समुद्रातून आला भयंकर व्हायरल"
Canva

Covert Mortality Nodavirus: नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाने लोकांची चिंता वाढवली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, समुद्रात आढळणारा एक व्हायरस (विषाणू) आता मानवी डोळ्यांनाही इजा पोहोचवू शकतो. हा व्हायरस कोळंबी आणि इतर सागरी जीवांमध्ये आढळायचा, पण आता त्याचा संबंध डोळ्यांच्या एका नवीन आजाराशी जोडला जात आहे. जर हा आजार वाढला, तर यामुळे डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते. या संशोधनामुळे आता आपला आहारही आजाराचे कारण बनू शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Covert Mortality Nodavirus काय आहे हा व्हायरस आणि आजार?

या व्हायरसचे नाव  कोव्हर्ट मॉर्टॅलिटी नोव्हाव्हायरस (CMNV) असे आहे. हा व्हायरस प्रामुख्याने कोळंबी (Lobster) आणि अनेक सागरी जीवांमध्ये आढळतो. शास्त्रज्ञांनी याचा संबंध डोळ्यांच्या एका आजाराशी जोडला आहे, ज्याला  'पर्सिस्टंट ऑक्युलर हायपरटेंशन व्हायरल अँटीरियर युव्हायटिस' (Persistent Ocular Hypertension Viral Anterior Uveitis) असे म्हणतात. या आजारामध्ये डोळ्यांच्या आतील दाब वाढतो आणि सूज (Swelling) येते. यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते आणि काळानुरूप दृष्टी कमी होऊ शकते.

संशोधनातून काय समोर आले?

चीनमध्ये केलेल्या या अभ्यासामध्ये (Study) 70 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व रुग्णांमध्ये डोळ्यांची समस्या आढळली. तपासणीत त्यांच्या डोळ्यांच्या आत व्हायरससारखे कण असल्याचे आढळून आले. विशेष बाब म्हणजे या रुग्णांच्या शरीरात CMNV विरुद्ध अँटीबॉडीज (Antibodies) देखील मिळाल्या. शास्त्रज्ञांनी या व्हायरससंदर्भात उंदरांवरही चाचणी केली. उंदरांमध्येही तीच लक्षणे दिसून आली जी माणसांमध्ये आढळली होती. यावरून हा व्हायरस याच आजाराशी संबंधित असू शकतो, असे संकेत मिळतात.

(नक्की वाचा : Osteoarthritis Treatment: गुडघ्यातून कटकट आवाज येतो? जिने चढताना त्रास होतो? डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा)

Covert Mortality Nodavirus चा संसर्ग कसा होऊ शकतो?

संशोधनानुसार सुमारे 70 टक्के रुग्णांचा संपर्क कच्च्या सी-फुडशी (सागरी अन्न) किंवा सागरी जिवांशी आला होता. म्हणजेच कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले सी-फूड खाणे हे यामागचे एक कारण असू शकते. पण अशीही काही प्रकरणे समोर आली आहेत जिथे रुग्णांचा असा कोणत्याही प्रकारे सागरी जिवांशी संपर्क आला नव्हता. यामुळे हा संसर्ग इतर मार्गांनीही पसरू शकतो का? अशी शंका बळावली आहे.

(नक्की वाचा : How To Get Rid Of Cockroaches: किचनमधील झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ट्राय करा 4 सोपे उपाय, मिनिटात पळतील झुरळं)

Covert Mortality Nodavirus चा धोका किती आहे?

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, यावर अद्याप अधिक संशोधनाची गरज आहे. पण जर हे खरे ठरले, तर सागरी व्हायरसचा मानवाच्या डोळ्यांच्या आजाराशी संबंध जोडण्याची ही पहिलीच वेळ असेल. चिंतेची बाब म्हणजे हा व्हायरस आतापर्यंत अनेक सागरी प्रजातींमध्ये आढळला असून तो जगाच्या वेगवेगळ्या भागांत अस्तित्वात आहे. अशा परिस्थितीत याचा धोका पुढे आणखी वाढू शकतो.

Covert Mortality Nodavirus पासून बचाव कसा करावा?

कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले सी-फुड खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सागरी प्राण्यांना किंवा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात नक्की धुवावे. जर डोळ्यांमध्ये वेदना, लालसरपणा किंवा अंधुकपणा जाणवला, तर त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com