जाहिरात

How To Get Rid Of Cockroaches: किचनमधील झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ट्राय करा 4 सोपे उपाय, मिनिटात पळतील झुरळं

How To Get Rid Of Cockroaches: किचनमधील झुरळांमुळे हैराण झालात? झुरळांना कायमचे पळवून लावण्याचे 4 सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घ्या.

How To Get Rid Of Cockroaches: किचनमधील झुरळांचा बंदोबस्त करायचाय? ट्राय करा 4 सोपे उपाय, मिनिटात पळतील झुरळं
"How To Get Rid Of Cockroaches: झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी 4 उपाय"
Canva

How To Get Rid Of Cockroaches: किचन हा आपल्या घराचा असा एक भाग आहे जिथे जेवणासोबतच आपले आरोग्याचाही तितकाच प्रश्न महत्त्वाचा असतो. पण अनेकदा मोठ्या प्रमाणात स्वच्छता करूनही किचनमध्ये झुरळे घाण पसरवतात. किचनमध्ये झुरळांचे फिरणं केवळ पाहायलाच घाण वाटत नाही तर आरोग्यासाठीही ते अतिशय घातक आहेत. झुरळं आपल्यासोबत अनेक आजार आणि बॅक्टेरिया घेऊन येतात. घरातील झुरळांचा खात्मा करायचा असेल तर काही घरगुती उपाय जाणून घेऊया... 

किचनमधील झुरळं पळवून लावण्याचे उपाय

1. बेकिंग सोडा आणि साखर

बेकिंग सोडा आणि साखरेमुळे घरातील झुरळे कमी होण्यास मदत मिळू शकते.
काय करावे: तुम्हाला फक्त समप्रमाणात बेकिंग सोडा आणि पिठीसाखर एकत्र करायची आहे. आता हे मिश्रण किचनचे कोपरे, सिंकच्या खाली आणि ज्या ठिकाणी झुरळे जास्त येतात तिथे शिंपडा. साखरेच्या गोडीमुळे झुरळे याकडे आकर्षित होतात आणि बेकिंग सोडा खाताच ती बाहेर पळून जातात.

2. तमालपत्र (तेजपत्ता)

तेजपत्त्याचा वापर केवळ स्वयंपाकाचा सुगंध वाढवण्यासाठीच नाही तर झुरळांना पळवून लावण्यासाठीही उपयुक्त आहे. कारण झुरळांना तमालपत्राचा उग्र सुगंध अजिबात आवडत नाही.
काय करावे: तुम्हाला फक्त काही तमालपत्रे घ्यायची आहेत, ती हाताने चुरडून किंवा कुटून पावडरसारखी करायची आहेत आणि किचनच्या कोपऱ्यात ठेवून द्यायची आहेत. तेजपत्त्याच्या वासाने झुरळे लगेच आपला रस्ता बदलतील.

(नक्की वाचा : Kitchen Tips: तुमच्या किचनमध्ये लपलाय मृत्यू! 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या तरच संपूर्ण कुटुंब राहील सुरक्षित)

3. लिंबू आणि बेकिंग सोडा

किचनचा ओटा आणि सिंकच्या स्वच्छतेसाठी लिंबू - बेकिंग सोडा हा सर्वोत्तम उपाय आहे.
काय करावे: एक लिटर पाण्यात दोन लिंबांचा रस आणि दोन चमचे बेकिंग सोडा नीट मिसळून घ्या. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून घ्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याने सिंक, बाथरूम, किचनचा आसपासचा भाग पुसून घ्या. याच्या आंबट वासामुळे आणि क्लीनिंग प्रॉपर्टीजमुळे झुरळे किचनमध्ये येणार नाहीत.

4. पुदिना तेल (पेपरमिंट ऑइल)

झुरळांना पुदिन्यासारख्या एसेंशियल ऑइल्सचा (अर्क तेल) सुगंध सहन होत नाही.
काय करावे: एका कप पाण्यात 10 ते 15 थेंब पुदिना तेल मिक्स करा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. रात्री पूर्ण किचन स्वच्छ केल्यानंतर या मिश्रणाचा शिडकाव झुरळे लपतात त्या जागी करा. यामुळे किचन सुगंधाने दरवळेल आणि झुरळेही पळून जातील.

या गोष्टींची नक्की काळजी घ्या

  1. रात्री सिंकमध्ये कधीही खरकटी (घाणेरडी) भांडी ठेवू नका, कारण अन्नाचे उरलेले तुकडेच झुरळांना आमंत्रण देतात.
  2. कचऱ्याचा डबा (डस्टबिन) नेहमी झाकून ठेवा आणि आठवड्यातून एकदा किचनची डीप क्लीनिंग (खोलवर स्वच्छता) नक्की करा.
  3. अन्न नेहमी झाकूनच ठेवा, जेणेकरून त्यात झुरळे जाणार नाहीत.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com