जाहिरात

D Mart: डी मार्टमध्ये कोणत्या दिवशी खरेदी करणं फायद्याचं? फक्त 'या' दिवशी खरेदी टाळा, राहाल फायद्यात

वीकेंडला सुट्टीचा फायदा घेत संपूर्ण कुटुंब खरेदीसाठी बाहेर येतं. त्यामुळेच स्टोअरमधील वर्दळ कमालीची वाढते.

D Mart: डी मार्टमध्ये कोणत्या दिवशी खरेदी करणं फायद्याचं? फक्त 'या' दिवशी खरेदी टाळा, राहाल फायद्यात
  • डी मार्टमध्ये महिन्याच्या सुरूवातीस एक ते सात तारखेदरम्यान ग्राहकांची प्रचंड गर्दी असते
  • गर्दीमुळे बिलिंग काउंटरवर लांब रांगा लागतात आणि ग्राहकांना खूप वेळ वाया जातो
  • शनिवार किंवा रविवार असतील तर वीकेंडच्या सुट्टीत संपूर्ण कुटुंब खरेदीसाठी बाहेर येते

एकाच ठिकाणी सर्व वस्तूंची खरेदी करायची असेल तर हक्काचे ठिकाण म्हणजे डी मार्ट. मध्यम वर्गीयांची पहिली पसंती ही डी मार्टलाच असते. त्यामुळे कुठल्या ही शहरातल्या डी मार्टमध्ये आपल्याला नेहमीच गर्दी दिसून येते. डी मार्ट आणि गर्दी हे एक समिकरण झालं आहे. कोणी महिन्याच्या सुरूवातीला जातं तर कुणी पगार झाल्यानंतर जातं. काही जण थेट महिन्याच्या शेवटी ही डी मार्टची चक्कर मारतात.  अशा वेळी डी मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जाण्याचा उत्तम दिवस कोणता असा आपल्याला प्रश्न पडतो. त्याचेच उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल.    

राधाकृष्णन दमानी यांनी 2002 मध्ये डी मार्टची सुरूवात केली. या रिटेल चेनचा सध्या देशात दबदबा आहे. डी मार्टमध्ये 1 ते 7 तारखेदरम्यान ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत असल्याचं समोर आलं आहे. या काळात स्टोअरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. ऐवढेच काय तर पार्किंगचा ही प्रश्न निर्माण होते. डी मार्टमध्ये गर्दी असल्याने आपोआप त्याचा परिणाम हा बिलिंग पद्धतीवर होतो. बिलींग काउंटरपर्यंत लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसतो. काही वेळा मनस्ताप सहन करावा लागतो. 

नक्की वाचा - Success Story: कोट्यवधींच्या पगाराची ऑफर, तरी ही नाकारली नोकरी, वडिलांची हत्या झाली त्याच गावात त्याने...

​याच दिवसात डी मार्टमध्ये गर्दी का होते असा ही प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. या मागचे मोठे कारण म्हणजे नोकरदार वर्गाचा पगार याच दिवसात होतो. महिन्याच्या सुरुवातीला पगार झाल्यानंतर बहुतांश कुटुंबे संपूर्ण महिन्याचा किराणा आणि घरगुती सामान भरण्यासाठी डी-मार्टमध्ये जात असतात.  त्यातच जर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार आला, तर ही गर्दी दुपटीने वाढते. वीकेंडला सुट्टीचा फायदा घेत संपूर्ण कुटुंब खरेदीसाठी बाहेर येतं. त्यामुळेच स्टोअरमधील वर्दळ कमालीची वाढते.

नक्की वाचा - DMart Bill: डी मार्टच्या बिलावर पेनाने तीन रेषा का मारतात? 99 टक्के लोकांना याची कल्पनाच नाही

​अतिगर्दीमुळे ग्राहकांचा बराच वेळ वाया जात असल्याचं ही समोर आलं आहे.  केवळ बिल देण्यासाठी लांब रांगा लागलेल्या असतात.  तर आकर्षक ऑफर्समुळे अनेक लोकप्रिय वस्तूंचा साठा (स्टॉक) लवकर संपतो. जर तुम्हाला शांततेत आणि वेळेची बचत करून खरेदी करायची असेल, तर महिन्याच्या 10 ते 25 तारखेदरम्यानचा काळ उत्तम मानला जातो. याच दिवसात जर तुम्ही डी मार्टमध्ये गेलात तर तुम्ही फायद्यात राहू शकता.  त्यातही सोमवार ते गुरुवार या कार्यालयीन दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. शिवाय सकाळी डी मार्ट उघडल्यांनंतर किंवा दुपारच्या वेळेत गेल्यास अत्यंत कमी गर्दीत तिथे असते.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com