जाहिरात

D-Mart मध्ये कोणत्या वस्तूंची होते सर्वात जास्त चोरी? सुरक्षा यंत्रणा असताना चोरीचा फंडा काय?

डी मार्टमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी तुमच्याकडील बॅग ही काऊंटरवरच जमा करून घेतली जाते.

D-Mart मध्ये कोणत्या वस्तूंची होते सर्वात जास्त चोरी? सुरक्षा यंत्रणा असताना चोरीचा फंडा काय?
  • डी मार्टमध्ये ग्राहकांच्या बॅग काऊंटरवर जमा करून घेतल्या जातात
  • डी मार्टमध्ये चोरीच्या घटना सोशल मीडियावर चर्चेत असून ग्राहकांनी हात चलाखीने वस्तू चोरी केल्याचे सांगितले आहे
  • चोरीच्या वस्तूंमध्ये लहान कपडे जसे अंडरगारमेंट्स, मोजे, टी-शर्ट आणि काही खाद्यपदार्थांचा समावेश आहे

सर्व सामान्यांचा खरेदीसाठी कल जर कुठे असेल तर तो 'डी-मार्ट'कडे असतो. फार कमी वेळात डी मार्टने मध्यमवर्गीयांना आपल्याकडे आकर्षीत करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे शहरातल्या कुठल्याही डी मार्टमध्ये कधी ही गेलात तर गर्दी ही दिसत असते. देशातील जवळपास अकरा राज्यात डी मार्ट आहेत. डी मार्टमध्ये खरेदीला जाताना तिथे सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे. मात्र हे सुरक्षेचे कडे भेदून अनेक जण काही वस्तू चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर याची चर्चा ही होते. यात कोणत्या कोणत्या वस्तू चोरी केल्या जातात ते आपण पाहणार आहोत. 

डी मार्टमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी तुमच्याकडील बॅग ही काऊंटरवरच जमा करून घेतली जाते. ती परत घेवून जाण्यासाठी एक बिल्ला ही दिला जातो. जर तुमच्याकडे लहान बॅग असेल तर त्याला सील केले जाते. त्यानंतरच ती तुम्ही आत घेवून जावू शकता. तुम्ही खरेदी करून बील पे  केल्यानंतर त्या बॅगचा सिल काढले जाते. डी मार्टमध्ये या गोष्टी काटेकोर पणे पाळल्या जातात. असं असलं तरी अनेक ग्राहक हात चलाखी करून काही वस्तू तिथून लांबवता, असे दावे सोशल मीडियावर केलेले पाहायला मिळतात.  

नक्की वाचा - Big News: डॉनच्या घरात पैशांचा डोंगर! पैसे मोजण्यासाठी 5 मिशन, धाडीत 'जे' सापडलं ते पाहून भलेभले हादरले

डी मार्टमध्ये विकल्या जाणाऱ्या अशा काही वस्तू आहेत ज्या सहज पण चोरल्या जातात. त्यात लहान कपड्यांचा समावेश आहे. अंडरगारमेंट्स, मोजे आणि टी-शर्ट यांसारख्या लहान वस्तूचा समावेश आहे. या चोरण्यासाठी अनेक वेळा ट्रायल रूमचा किंवा गर्दीचा वापर केला जातो. काही खाद्यपदार्थ ही हे चोर चोरतात. त्यात चॉकलेट्स आणि स्नॅक्सचे पाकीट स्टोअरमध्येच उघडून खाल्ले जातात. त्याचे बिल न देता बाहेर पडण्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. काही व्हिडीओ ही त्याचे समोर आले आहे. 

नक्की वाचा - Wari Special: वय वर्ष 81, सलग 41 वर्ष पायी वारी! आता ही तोच जोष, तोच उत्साह, वारकऱ्याची थक्क करणारी कहाणी

डी-मार्टच्या अनेक शाखा स्वतःच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे भाड्याचा खर्च वाचतो. तसेच, थेट खरेदी आणि कार्यक्षम सप्लाय चेनमुळे कंपनी स्वस्त दरात माल उपलब्ध करून देते. डी-मार्टने चोरीच्या घटनांबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी किंवा माहिती जाहीर केलेली नाही. हे ही तितकेच खरे आहे. सोशल मीडियावर होणारे हे दावे आहेत. त्यानुसार या गोष्टी समोर आल्या आहेत. सोशल मीडियातूनच याचे खुलासे होत आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com