
Daatala Kid Laglyas Kay Karave: दातांची योग्य देखभाल न केल्यास दातांना कीड लागून ते खराब होऊ शकतात. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकामध्ये दातांच्या समस्या वाढत आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये दातदुखी, दात किडणे या समस्या जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत. दात किडण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त प्रमाणात गोड तसेच साखरयुक्त पदार्थ खाणे हे आहे. दातांवर जंतू जमा होऊन त्याचे रुपांतर अॅसिडमध्ये होते तेव्हा दात किडण्याची समस्या निर्माण होते. यामुळे दात कमकुवत होतात. दातांचे आरोग्य निरोगी राहावे, याकरिता तीन प्रभावी घरगुती उपाय आपण जाणून घेऊया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दात किडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय (Daatala Lagleli Kid Kadhnyasathi Gharguti Upay)
लवंगाचे तेल : जंतूंचा खात्मा करण्यासाठी उपाय
तेल कसे काम करते?लवंगामधील अँटी-बॅक्टेरिअल आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. यामुळे दातांचे किडणे कमी होण्यासह वेदनांपासूनही सुटका मिळू शकते.
लवंगाच्या तेलाचा कसा करा वापर?- कापसावर लवंगाच्या तेलाचे दोन-तीन थेंब ओतावे.
- किडलेल्या दातांवर कापूस ठेवावा.
- कापूस थोड्या वेळासाठी दातांवर ठेवा आणि त्यानंतर तोंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
मीठ आणि मोहरीचे तेल : दात मजबूत करण्यासाठी रामबाण उपाय
मिठामध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे जंतूंचा खात्मा होण्यास मदत मिळते. मोहरीच्या तेलामुळे दातांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि किडलेल्या दातांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Sanitary Pads Disposal: सॅनिटरी पॅड्ससह कालबाह्य औषधांबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, करणार हे काम)
कसा करावा उपाय?- एक चमचा मिठामध्ये मोहरीच्या तेलाचे दोन-तीन थेंब मिक्स करा.
- मिश्रणाने दात आणि हिरड्यांचा मसाज करावा.
- पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करावे.
कडुलिंबाची पाने : नैसर्गिक पद्धतीने जंतूंचा खात्मा करा
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी- बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत, यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत मिळते. दातांना लागलेली कीड कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.
(नक्की वाचा: Viral Trend: हिरव्या रंगाचं नेलपेंट खरंच आयुष्य बदलू शकते? वाचा काय आहे Green Nail Theory)
दातांसाठी कडुलिंबाच्या पानांचा कसा करावा वापर?
- कडुलिंबाची चार-पाच पाने पाण्यामध्ये उकळा.
- पाणी थोडेसे कोमट होऊ द्यावे. या पाण्याने चूळ भरावी.
- नियमित हा उपाय केल्यास दात स्वच्छ राहण्यास मदत मिळेल.
कॅव्हिटीपासून दातांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स
- नियमित ब्रश करा.
- गोड आणि चिकट पदार्थ खाणे टाळा.
- दिवसभरात कमीत कमी दोनदा दात स्वच्छ करावे आणि कोमट पाण्याने चूळ भरावी.
- सहा महिन्यांनंतर दातांची तपासणी करावी.
दातांमध्ये कीड लागली असल्यास या घरगुती उपचारांची मदत घेऊ शकता. पण समस्या गंभीर असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क साधावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world