
Green Nail Theory Viral Trend: सोशल मीडियावर दररोज काही-न्-काही नवीन ब्युटी ट्रेंड्स पाहायला मिळतात. व्हायरल ट्रेंड्समध्ये बदलही वेगाने पाहायला मिळतात. सध्या 'ग्रीन नेल थिअरी' सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडनुसार हिरव्या रंगाचे नेलपेंट केवळ फॅशन स्टेटमेंट नाहीय तर यामुळे पैसा, शांती, आरोग्य आणि नशीब देखील चांगले होण्यास मदत मिळते;असे म्हटलं जात आहे. यापूर्वी व्हायरल झालेले "रेड-ब्ल्यु नेल थिअरी'चे हे नवे रूप आहे, अशी चर्चा आहे. 'रेड नेल थिअरी'नुसार, लाल रंगाच्या नेलपेंटद्वारे तुम्ही तुम्हाला हवे असलेले प्रेमाचे नाते आकर्षित करू शकता. तर ब्ल्यु नेल थिअरी म्हणजे नातेसंबंधांमध्ये जोडले जाण्यास मदत मिळते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'ग्रीन नेल थिअरी' (Green Nail Theory)
ग्रीन नेल थिअरीस सोशल मीडिया युजर्स आताच्या युगातील मेनिफेस्टेशनचे टुल मानत आहेत. रिपोर्ट्सनुसार, गुगलवर 'ग्रीन नेल थिअरी'बाबत (Green Nail Theory) मोठ्या प्रमाणात माहिती सर्च करण्यात आली. Ora Mer कंपनीचे संस्थापक रचेल ऑनफेटर यांनी म्हटलंय की, 'तुम्ही निवडलेले रंग तुमच्यातील ऊर्जेचे प्रतिबिंब दर्शवते. हिरवा रंग्यामुळे जीवनात यश आणि सकारात्मक विचार निर्माण होतात'.
(नक्की वाचा: हवरटपणा नडला! तोंडात भरलेला जिवंत मासा त्याच्या श्वसननलिकेत अडकला आणि पुढे भयानकच घडलं...)
'ग्रीन नेल थिअरी' ब्युटी ट्रेंड चर्चेत का आहे? (Beauty Trends 2025)
मानसशास्त्रानुसार, हिरवा रंग शांतता-उपचार आणि तणावमुक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून कित्येक रुग्णालयांमध्ये हिरव्या रंगाचा वापर केला जातो, जेणेकरून रुग्णांना शांतता अनुभवण्यास मिळेल. दरम्यान या नेल थिअरीस कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही. पण लोक यास आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा मार्ग समजू लागले आहेत. दुसरीकडे हा ट्रेंड महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षमीकरणासाठी प्रेरित करत असल्याचे काहींचे म्हणणं आहे.
(नक्की वाचा: आराध्यानं ऐश्वर्या-अभिषेकसोबत 'कजरा रे' गाण्यावर केला जबरदस्त नाच, छोटी बच्चनच्या डान्सचा Video Viral)
अन्य व्हायरल नेल थिअरींचाही समावेश
- ब्लॅक नेल थिअरी : ताकद आणि रहस्याशी संबंधित असलेला हा ट्रेंड आत्मविश्वास वाढवत असल्याचे म्हटलं जातंय.
- व्हाइट नेल थिअरी : रिलेशनशिपबाबतचे संकेत
- पिंक नेल थिअरी : स्त्रीत्वाचे प्रतीक
तुम्हाला देखील एखादा नवा ब्युटी ट्रेंड फॉलो करण्याची इच्छा होत असल्यास यावेळेस ग्रीन नेल्स थिअरी नक्की ट्राय करून पाहा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world