6 May 2026 Panchang: सावधान! आजच्या पंचांगानुसार हे 2 काळ अत्यंत घातक; महत्त्वाची कामे करण्यापूर्वी वेळ तपासा

6 May 2026 Panchang: 6 मे 2026 चे संपूर्ण पंचांग: सूर्योदय, सूर्यास्त, शुभ मुहूर्त, राहु काळ आणि संत चोखामेळा पुण्यतिथी विशेष माहिती. जाणून घ्या पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आजचे चंद्रबळ, उपासना आणि कार्यसिद्धीच्या वेळा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"6 May 2026 Panchang: कसा असेल आजचा दिवस?"
Canva

6 May 2026 Panchang News: सनातन धर्मामध्ये पंचांगाचे विशेष महत्त्व आहे. तिथी, नक्षत्र, योग, वार इत्यादी गोष्टींच्या आधारे दिवसाची सुरुवात, शुभ-अशुभ वेळ ठरवले जातात. आजचे म्हणजे 6 मे रोजीचे पंचांग काय आहे, याबाबत पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगानुसार (पुणे) आज शालिवाहन शक 1948, पराभव संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतू आणि वैशाख कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. आजचा वार बुधवार असून आज संत चोखामेळा पुण्यतिथी आहे.

Advertisement

सूर्योदय आणि सूर्यास्त

आज सूर्योदय सकाळी 06:08 वाजता झाला असून सूर्यास्त संध्याकाळी 18:54 वाजता होईल. चंद्रोदय रात्री 23:07 वाजता होणार आहे.

6 May 2026 महत्त्वाच्या वेळा

  1. प्रात: संध्या: पहाटे 04:56 वाजेपासून ते सकाळी 06:08 वाजेपर्यंत आहे.
  2. सायं संध्या: संध्याकाळी 18:54 वाजेपासून ते रात्री 20:06 वाजेपर्यंत आहे.
  3. प्रदोषकाळ: संध्याकाळी 18:54 वाजेपासून ते रात्री 21:08 वाजेपर्यंत आहे.
  4. निशीथ काळ: उत्तररात्री 00:08 वाजेपासून ते उत्तररात्री 00:53 वाजेपर्यंत आहे. (7 मे)
  5. राहु काळ: दुपारी 12:31 वाजेपासून ते दुपारी 14:06 वाजेपर्यंत आहे.
  6. यमघंट काळ: सकाळी 07:43 वाजेपासून ते 09:19 वाजेपर्यंत आहे.

लाभदायक आणि कार्यसिद्धी मुहूर्त

लाभ मुहूर्त : सकाळी 06:08 वाजेपासून ते सकाळी 07:43 वाजेपर्यंत आहे.
अमृत मुहूर्त : सकाळी 07:43 वाजेपासून ते सकाळी 09:19 वाजेपर्यंत आहे.
विजय मुहूर्त: दुपारी 14:38 वाजेपासून ते दुपारी 15:29 वाजेपर्यंत आहे.

कार्यसिद्धीसाठी महत्त्वाच्या वेळा

  1. सकाळी 09:19 वाजेपासून ते सकाळी 09:32 वाजेपर्यंत आहे.
  2. दुपारी 12:05 वाजेपासून ते दुपारी 12:31 वाजेपर्यंत आहे.
  3. दुपारी 14:06 वाजेपासून ते दुपारी 14:38 वाजेपर्यंत आहे.
  4. संध्याकाळी 16:20 वाजेपासून ते संध्याकाळी 18:02 वाजेपर्यंत आहे.
  5. रात्री 20:23 ते रात्री 22:38 वाजेपर्यंत या वेळा अत्यंत शुभ आहेत.

कार्यनाशक वेळा (सावधानता बाळगा): या काळात महत्त्वाची कामे करणे टाळावे

  1. सकाळी 06:08 वाजेपासून ते सकाळी 07:50 वाजेपर्यंत आहे.
  2. सकाळी 09:32 वाजेपासून ते दुपारी 12:05 वाजेपर्यंत आहे.
  3. दुपारी 14:38 वाजेपासून ते संध्याकाळी 16:20 वाजेपर्यंत आहे.
  4. संध्याकाळी 18:02 वाजेपासून ते रात्री 20:23 वाजेपर्यंत आहे. 
  5. रात्री 22:38 वाजेपासून ते रात्री 24:00 वाजेपर्यंत आहे.

(नक्की वाचा: Temple Bell: मंदिरात पाऊल ठेवताच घंटी का वाजवतात? केवळ परंपरा नाही, तर यामागे दडलंय मोठं शास्त्रीय गुपित!)

आजचे विशेष आणि उपासना

  1. आज शिवास नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. 
  2. बुधवारी 'बुं बुधाय नमः' या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल. 
  3. आज हिरवे वस्त्र परिधान करावे आणि गव्हाच्या वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे. 
  4. दान करण्यासाठी निळे वस्त्र, सुवर्ण, मूग किंवा फुले उत्तम आहेत. 
  5. आजच्या दिवशी बेलफळ खाणे किंवा स्त्रीसंग वर्ज्य मानला गेला आहे.

ग्रहस्थिती आणि चंद्रबळ

आज सूर्य मेष राशीत आणि चंद्र धनु राशीत असेल. मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ आणि मीन या राशींना आज दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे. उत्तर दिशेला प्रवास करायचा असल्यास तीळ भक्षण करून बाहेर पडावे, कारण आज या दिशेला दिशाशूल आहे.

Photo Credit: NDTV Marathi

मुंबई बंदर भरती/ओहोटी

रात्री 23:12 वाजता भरती असून, 7 मे रोजी पहाटे 04:41 वाजता ओहोटी असेल. त्यानंतर 7 मे रोजी सकाळी 10:12 वाजता पुन्हा भरती होईल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)