जाहिरात

Nail Polish Dangerous to Health : नेल पॉलिश आरोग्यासाठी धोकादायक; थेट मज्जासंस्थेवर होतो आघात

सौंदर्य तर महत्त्वाचं आहेच. पण आरोग्य त्याहूनही अधिक मौल्यवान आहे. म्हणून ट्रेंड किंवा फॅशन फॉलो करताना थोडी माहिती, थोडी खबरदारी घ्यावी. कारण तेच खरं स्मार्ट सौंदर्य आहे. 

Nail Polish Dangerous to Health : नेल पॉलिश आरोग्यासाठी धोकादायक; थेट मज्जासंस्थेवर होतो आघात

Nail Polish Dangerous to Health :  नखांवरचे रंग आज फक्त सौंदर्यापुरते राहिलेले नाहीत. तर ते तो फॅशन, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र या चकाकीमागे दडलेली रसायनं हळूहळू आरोग्याला धोका पोहोचवत आहेत का? नेल पॉलिशमधील घटक शरीरात शोषले जातात का? राष्ट्रीय आरोग्य लायब्ररीसह विविध वैज्ञानिक अहवाल काय सांगतात, पाहा हा विशेष रिपोर्ट.

आपली नखं मृत पेशींनी बनलेली असल्यानं त्यावर काहीही लावलं तरी शरीरावर परिणाम होत नाही, हा समज संशोधनात चुकीचा ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते नखं छिद्रयुक्त असतात. म्हणजे नेल पॉलिशमधील काही रसायनं नखांतून त्वचा, रक्तवाहिन्या आणि श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. 


नेल पॉलिशमधील मूलभूत घटक कोणते?

फिल्म फॉर्मर्स: नायट्रोसेल्युलोज  - नखांवर मजबूत थर तयार होतो
रेझिन / प्लास्टिसायझर्स - पॉलिश लवचिक राहण्यासाठी वापरलं जातं
सॉल्व्हेंट्स - वाळवण्यासाठी वापर होतो, त्याचा वास हवेत पसरतो
पिगमेंट्स - आकर्षक रंगांसाठी वापरतात.

नक्की वाचा - Chips Affect Memory : चिप्स तुमच्या मेंदूवर करतायेत हल्ला; नव्या अभ्यासातून पॅकेट फूडचं धक्कादायक वास्तव समोर

खरा धोका निर्माण करतो तो तथाकथित ‘टॉक्सिक ट्रायो' म्हणजे डिब्युटिल फ्थॅलेट, टोल्युईन आणि फॉर्मेल्डिहाइड


काय आहे 'टॉस्किक ट्रायो'?

1) डिब्युटिल फ्थॅलेट (DBP)

पॉलिश तुटू नये म्हणून वापर -  

हार्मोनल असंतुलन, प्रजननविषयक धोके असल्याने अनेक देशांमध्ये वापरावर मर्यादा

2) टोल्युईन

पॉलिशला स्मूथ टेक्स्चर - तीव्र वासामुळे डोकेदुखी, चक्कर, डोळ्यांत जळजळ, दीर्घकाळ संपर्कात मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

3) फॉर्मेल्डिहाइड

नखे कठीण करण्यासाठी - कॅन्सरकारक रसायन म्हणून ओळख, त्वचेची अॅलर्जी, श्वसनास त्रास संभवतो 

या रसायनांचा महिलेच्या आरोग्यावर फटका बसतो. नेल सॅलोनमध्ये नियमित काम करणाऱ्या टेक्निशियनना रसायनांच्या सतत संपर्कामुळे श्वसनाचे आजार, अस्थमा, डोळे आणि त्वचेच्या तक्रारी, तसेच हार्मोनल बदल दिसून येतात असं अभ्यासातून समोर आलं आहे. मग नेल पॉलिश पूर्णपणे टाळावी का? तर तज्ज्ञ म्हणतात गरज नाही. मात्र जाणीवपूर्वक आणि सुरक्षित वापर महत्त्वाचा आहे. 


नेल पॉलिश लावताना काय काळजी घ्यावी?

  • उत्पादनाचे लेबल आणि घटक वाचा
  • पॉलिश लावताना हवा खेळती ठेवा
  • बेस कोट वापरा
  • सतत पॉलिश न ठेवता नखांना विश्रांती द्या
  • मुलांसाठी वॉटर‑बेस्ड पेंट वापरा


सौंदर्य तर महत्त्वाचं आहेच. पण आरोग्य त्याहूनही अधिक मौल्यवान आहे. म्हणून ट्रेंड किंवा फॅशन फॉलो करताना थोडी माहिती, थोडी खबरदारी घ्यावी. कारण तेच खरं स्मार्ट सौंदर्य आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com