जाहिरात

Daughters Day 2025: मुली वडिलांच्या जास्त लाडक्या का असतात? संशोधकांनी सांगितलं खास कनेक्शन

National Daughters Day 2025: मुलगी वडिलांच्या अधिक जवळ असते. तर मुलं आईच्या जास्त जवळचे असतात असं मानलं जातं. याचं कारण काय?

Daughters Day 2025: मुली वडिलांच्या जास्त लाडक्या का असतात? संशोधकांनी सांगितलं खास कनेक्शन
Daughters Day 2025: वडील आपल्या मुलींवर जास्त प्रेम का करतात? या अभ्यास संशोधकांनी केला आहे.
मुंबई:

National Daughters Day 2025:  कोणत्याही घरात मुलीचा जन्म होतो, तेव्हा सर्वात जास्त आनंद तिच्या वडिलांना होतो. कोणताही बाप स्वत:च्या मुलीमध्ये त्याची पत्नी किंवा आपल्या आईची झलक पाहतो आणि तिच्यावर खूप प्रेम करतो. घरात आधी मुलगा असूनही, मुलगी वडिलांच्या अधिक जवळ असते. तर मुलं आईच्या जास्त जवळचे असतात असं मानलं जातं.

देशभरात दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी डॉटर्स डे साजरा केला जातो, ज्यामध्ये मुलींचे कुटुंबासाठी असलेले खास प्रेम आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण केले जाते. वडील आणि मुलीचं नातं इतकं खास का असतं आणि कुटुंबात तिला सर्वाधिक प्रेम का दिलं जातं, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बाबा - मुलीचं नातं खास

घरात मुलगी असणं हे लक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक मानलं जातं. मुलीच्या जन्मापासून ते ती मोठी होईपर्यंत वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलीच्या प्रत्येक इच्छेसाठी तिचे बाबा वाट्टेल ते करायला तयार असतात.  मुलीवर कोणतंही संकट येण्यापूर्वी वडील ते स्वतः झेलतात. त्याचप्रमाणे, मुलीसुद्धा आपल्या वडिलांवर जीवापाड प्रेम करतात. कित्येक वर्षांपासून हे नातं असंच सुरु आहे.

( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
 

वडील मुलींवर जास्त प्रेम का करतात?

वडील आपल्या मुलींवर जास्त प्रेम का करतात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एमरी युनिव्हर्सिटीच्या (Emory University) संशोधकांनी एक अभ्यास (Study) केला होता. या अभ्यासातून असं दिसून आलं की, मुलींच्या बाबतीत वडील आपल्या भावना अधिक व्यक्त करतात, तर मुलांच्या बाबतीत याउलट होतं. मुलगी रडत असेल, तर तिला शांत करण्यासाठी वडील लवकर जातात. तिला त्रास होताच तो वडिलांना सहन होत नाही. ते लगेच तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे, मुलींनी काही गोष्टी मागितल्यावरही वडिलांची लगेच प्रतिक्रिया येते. मुलींना आनंदी पाहिल्यावर वडिलांना एक वेगळाच अनुभव येतो, असंही या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे.

एक खास कनेक्शन 

माणसाचं कनेक्शन अनेकदा दुसऱ्या लिंगाच्या व्यक्तीसोबत अधिक तयार होतं. याच कारणामुळे मुलींशी वडिलांचं एक नैसर्गिक कनेक्शन (Connection) तयार होतं. आपल्या मुलीची काळजी घेणं आणि तिच्यासाठी नेहमी खंबीरपणे उभं राहणं हे वडिलांचं कर्तव्य बनून जातं. मुलांच्या बाबतीतही हे होतं, पण त्यात काही प्रमाणात कमी दिसून येऊ शकते.

( नक्की वाचा : Menstruation Cyle: मासिक पाळी सुरू झाली की केळीच्या झाडाशी लग्न! देशात 'इथं' आजही पाळली जाते अजब परंपरा )
 

लेकीसाठी बाबा हिरो

वडिलांच्या या प्रेमाबद्दल मुलीही त्यांच्यावर खूप प्रेम करतात. बाबा हे तिची शक्ती (Strength) असतात. आपल्यावर कोणतंही संकट आलं तरी त्यामधून बाबा बाहेर काढतील, सावरतील याची तिला खात्री असते. त्यामुळेच मुलगी वडिलांनाच स्वत:चा हिरो (Hero) मानू लागते. दोघांमध्ये एक खास बंध (Bond) तयार होतो आणि तो नेहमी कायम राहतो.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com