
National Daughters Day 2025: देशभरात 28 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय कन्या दिन' (National Daughter Day) साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश मुलींचे महत्त्व अधोरेखित करणे, त्यांच्या समस्यांवर विचार करून त्यांच्या कल्याणासाठी ठोस पाऊले उचलणे हा आहे. ज्या समाजात आजही मुलींना आणि महिलांना पुरुषांपेक्षा कमी मानले जाते, त्या समाजात मोठा बदल घडवून आणण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतो. या दिवशी मुलींना त्यांच्या शक्ती, सामर्थ्य आणि अधिकारांविषयी जागरूक केले जाते.
आपल्या मुलींच्या हक्कांविषयी त्यांना जागरूक करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणेही गरजेचे आहे. जर तुम्हीही मुलीचे वडील असाल, तर आजच्या दिवसाचे औचित्य साधून तिच्या भविष्यातील गरजा पूर्ण व्हाव्यात आणि ती आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावी यासाठी तुम्ही काही चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही सरकारी योजना फायदेशीर ठरतात.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana - SSY)
- मुलींच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे.
- मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तिचे पालक तिच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- यामध्ये दरवर्षी कमीतकमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
- स्कीममध्ये 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते आणि 21 वर्षांनी ती मॅच्युअर होते.
- सध्या या स्कीमवर 8.2% व्याज मिळत आहे. मुलीच्या उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी ही रक्कम वापरता येते.
महिला सन्मान सेविंग्ज सर्टिफिकेट (Mahila Samman Savings Certificate)
- महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी ही खास डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात आली आहे.
- महिला यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकतात.
- ही रक्कम 2 वर्षांसाठी जमा केली जाते.
- सध्या या स्कीमवर महिलांना 7.5% दराने व्याज दिले जाते.
- कोणतीही महिला यात गुंतवणूक करू शकते, तसेच अल्पवयीन मुलीच्या नावाने त्यांचे पालक गुंतवणूक करू शकतात.
(नक्की वाचा- UPI New Rules: डिजिटल पेमेंटच्या नियमात मोठा बदल! RBIकडून घोषणा, कधीपासून अंमलबजावणी होणार?)
एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan Policy)
- या स्कीमचा पॉलिसी टर्म 13 ते 25 वर्षांचा आहे.
- प्रीमियमचा भरणा मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करता येतो.
- जर तुम्ही 25 वर्षांचा टर्म प्लॅन निवडला, तर तुम्हाला 22 वर्षांपर्यंतच प्रीमियम भरावा लागतो आणि 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी सम ॲश्योअर्ड + बोनस + फायनल बोनससह संपूर्ण रक्कम दिली जाते.
- मुलीच्या वडिलांचे वय कमीतकमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 वर्षे असावे लागते.
एसआयपी (SIP)
- एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. ही एक मार्केट लिंक्ड स्कीम आहे.
- या स्कीममध्ये फक्त 500 रुपये महिन्यापासूनही गुंतवणूक सुरू करता येते.
- दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास यात सरासरी 12% च्या आसपास चांगला रिटर्न मिळू शकतो, जो अनेक पारंपरिक स्कीम्सपेक्षा खूप चांगला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world