Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला करा पंचोपचार पूजन, दिव्यांची अशी पूजा केल्यास मिळेल मोठा आशीर्वाद

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्यास कोणता आशीर्वाद मिळेल, कशी करावी पूजा, कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती….

जाहिरात
Read Time: 2 mins
Deep Amavasya 2025: दिव्यांचे पंचोपचार पूजन म्हणजे काय?

Deep Amavasya 2025 Puja : हिंदू परंपरेनुसार दीप अमावस्या ‘दिव्याची अमावस्या' आणि ‘आषाढ अमावस्या' या नावानेही ओळखली जाते. यंदा 24 जुलैला दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) आहे. या दिवशी दिव्यांचे पूजन करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. फलज्योतिषी पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दीप अमावस्येला ( (Deep Amavasya 2025 Date) नेमकी कशा पद्धतीने पूजा करावी? यामुळे कोणते लाभ मिळतील? याबाबत दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया… 

दीप अमावस्येच्या दिवशी कशी करावी पूजा? (Deep Amavasya 2025 Puja Vidhi)

  1. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील धातूंचे सर्व दिवे स्वच्छ करुन घ्यावे. 
  2. घरामध्ये मातीच्या पणत्या असतील तर त्या देखील व्यवस्थित पद्धतीने पूजेसाठी मांडाव्यात.
  3. स्वच्छ धुतलेले दिवे, निरांजन, मातीच्या पणत्या प्रज्वलित करा. 
  4. यानंतर पंचोपचार पूजन म्हणजे पाच उपचार; यामध्ये गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य या पाच गोष्टींनी प्रज्वलित दिव्यांचे पूजन करावे.
  5. लाह्या, फुटाणे, दूध, साखर यांचा नैवेद्य अर्पण करावा. 
  6. प्रज्वलित अग्नि नारायणासमोर "भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योषिषां प्रभुरव्ययःI आरोग्यंदैहिपुत्रांश्च अवैधव्यं प्रयच्छमेII" हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी. 
  7. अशा पद्धतीने पूजा केल्यास दीर्घायुष्याची, आरोग्याची प्राप्ती होते. विशेषतः महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते, असेही पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी सांगितले आहे. 
  8. दीप अमावस्येची तिथी आणि शुभ मुहूर्त (2025) : प्रारंभ तिथी : 24 जुलै 2025, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता, समाप्ती तिथी: 25 जुलै 2025, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता आणि अमृत काळ: 24 जुलै 2025, दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 3:00 वाजेदरम्यान असेल.

(नक्की वाचा: Deep Amavasya 2025: दीप अमावस्या कधी आहे? कसे करावे दीपपूजन, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)