जाहिरात

Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत

Aloe Vera Drink For Body Detox:उन्हाळ्यात शरीराला थंड देण्यासाठी आणि डिटॉक्स ठेवण्यासाठी 'अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक' उत्तम उपाय आहे. घरी बनवण्याची सोपी पद्धत, फायदे आणि कोणती काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...

Aloe Vera Detox Drink : उन्हाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी कसे तयार करावे अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक? वाचा सोपी पद्धत
"Aloe Vera Drink For Body Detox: कोरफडीचा ज्युस पिण्याचे फायदे"
Canva

Aloe Vera Drink For Body Detox: उन्हाळा सुरू होताच त्याचे परिणाम आपल्या शरीरावर स्पष्टपणे दिसू लागतात. जास्त घाम येणे, थकवा जाणवणे, डिहायड्रेशन आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होणे सामान्य बाब आहे. अशा वेळेस शरीर आतील बाजूने स्वच्छ होणे आणि थंड राहणे आवश्यक असते. अनेक लोक यासाठी बाजारातील थंड पेयांवर अवलंबून असतात, पण त्याऐवजी तुम्ही घरच्याघरी 'अ‍ॅलोवेरा ड्रिंक' तयार करू शकता. हे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करते.

अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक का खास आहे? | Aloe Vera Drink Benefits

अ‍ॅलोव्हेरामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषणतत्त्वे असतात, जी शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होते. नियमित आणि योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

घरच्या घरी अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक कसे तयार करावे? | Homemade Aloe Vera Drink

अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक तयार करणं अतिशय सोपे आहे. सर्वप्रथम ताज्या कोरफडीच्या पानातील गर काढून घ्या. कोरफडीचा गर स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल. आता हे जेल मिक्सरमध्ये टाका आणि त्यात एक ग्लास पाणी मिसळा. चवीसाठी थोडे लिंबू आणि मध मिक्स करू शकता. सर्व साहित्य नीट ब्लेंड करा. तुमचे आरोग्यदायी ड्रिंक तयार आहे.

अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक कधी आणि कसे प्यावे?

हे पेय सकाळी रिकाम्या पोटी पिणे जास्त फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत मिळते. हे लक्षात ठेवा की याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे, कारण अतिसेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

(नक्की वाचा: Homemade Limbu Pani Recipe: लिंबू पाणी बनवताना करताय ही चूक? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी)

या गोष्टींची घ्या काळजी

अ‍ॅलोव्हेरा ड्रिंक पिण्यास सुरुवात करताना कमी प्रमाणात घ्यावे. जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी किंवा त्रास जाणवला, तर लगेच पेय पिणे थांबवा. गरोदर महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे.

उन्हाळ्यात शरीर आतून निरोगी ठेवायचे असेल आणि ताजेतवाने राहायचे असेल, तर कोरफड ज्युस पिणे हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी हे पेय प्यायल्यास शरीराला थंडावा तसेच ऊर्जा दोन्ही मिळू शकते.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com