Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat: हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. या तिथीस प्रबोधिनी एकादशी (Probodhini Ekadashi 2025) असेही म्हणतात. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात, म्हणूनच या एकादशीला 'देवोत्थनी एकादशी' म्हटले जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि यानंतर सर्व प्रकारच्या शुभ तसेच मंगल कार्यास सुरुवात केली जाते. भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होणारी देशउठनी एकादशी यंदा कधी आहे, तिथी कालावधी, शुभ मुहूर्तासह अन्य सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...
देवउठनी एकादशी 2025 शुभ मुहूर्त | देवोत्थनी एकादशी शुभ मुहूर्त | प्रबोधिनी एकादशी शुभ मुहूर्त| Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat | Prabodhini Ekadashi 2025 | Kartiki Ekadashi 2025
पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाची एकादशी तिथी 1 नोव्हेंबर 2025 (शनिवारी) सकाळी 9.11 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबर 2025 (रविवारी) रोजी सकाळी 7.31 वाजता तिथी समाप्त होईल. यानुसार देवउठनी एकादशीचे व्रत 1 नोव्हेंबर 2025 रोजी केले जाईल. दुसरीकडे वैष्णव परंपरेशी जोडलेली मंडळी उदया तिथीनुसार देवोत्थनी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी साजरी करतील. सुरपतिदासजी यांच्या मते 2 नोव्हेंबर रोजी इस्कॉन वृंदावन येथे एकादशीची पूजा आणि व्रत केला जाईल.
देवउठनी एकादशी व्रताचे पारण कधी करावे? | Dev Uthani Ekadashi 2025 Paran Time
देवउठनी एकादशीचे व्रत 01 नोव्हेंबर 2025 रोजी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी 02 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 03:47 वाजेदरम्यान व्रताचे पारण करू शकता. उदया तिथीनुसार 02 नोव्हेंबर 2025 रोजी देवउठनी एकादशीचे व्रत आणि पूजा करणार असाल तर याचे पारण 03 नोव्हेंबर 2025 सकाळी 06:40 वाजेपासून ते सकाळी 08:57 वाजेदरम्यान व्रताचे पारण करावे.
देवउठनी एकादशी 2025 पूजा विधी | देवोत्थनी एकादशी पूजा विधी | प्रबोधिनी एकादशी पूजा विधी | Dev Uthani Ekadashi 2025 Puja Vidhi | Prabodhini Ekadashi 2025 | Kartiki Ekadashi 2025
- भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी पहाटे उठून स्नान करा.
- देवउठनी एकादशीच्या पूजा तसेच व्रत विधीवत करण्याचा संकल्प करावा.
- पूजा करण्यापूर्वी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
- यानंतर देवघरात किंवा घराच्या उत्तर-पूर्व दिशा तसेच ईशान्य दिशेला चौरंग मांडावा
- चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
- शुद्ध पाणी शिंपडावे. यानंतर हळदकुंकू, चंदन, केसर, आदी गोष्टी अर्पण करा.
- मनोभावे पूजा करून फळं-फुले, मिठाई, धूप-अगरबत्ती, दिवा प्रज्वलित करावी.
- आरती-प्रार्थना झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा.
देवउठनी एकादशीची पूजा या गोष्टींशिवाय अपूर्ण
- देवउठनी एकादशीचे व्रत भगवान विष्णू यांच्या आरती तसेच दुसऱ्यादिवशी शुभ मुहूर्तावर पारण न केल्यास अपूर्ण मानले जाते.
- देवउठनी एकादशीला भगवंताची कृपा मिळवण्यासाठी या एकादशीच्या व्रताची कथा आणि श्री विष्णु सहस्त्रनामाचेही पठण करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world