Devshayani Ekadashi 2025: देवशयनी एकादशीच्या दिवशी या मंत्रांचा करा जप, जीवनामध्ये येईल अपार सुख-समृद्धी 

Devshayani Ekadashi 2025: देवशयनी एकादशीचा उपवास केल्यास जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते, असे म्हणतात. या दिवशी काही विशेष मंत्रांचा जप केल्यास आध्यात्मिक लाभ आणि सुखसमृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळू शकते,अशीही मान्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Devshayani Ekadashi 2025: देवशयनी एकादशीच्या दिवशी या मंत्राचा करा जप

Devshayani Ekadashi 2025: हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशींचे व्रत केले जाते, ज्यामध्ये देवशयनी एकादशी सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या तिथीनंतर भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेमध्ये जातात. या तिथीस चातुर्मास असे म्हणतात. यादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. अशातच देवशयनी एकादशीचा उपवास करणे लाभदायक मानले जाते. यामुळे जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी येते असे म्हणतात. तसेच देवशयनी एकादशीच्या (Devshayani Ekadashi 2025) दिवशी काही विशेष मंत्रांचा जप केल्यास आध्यात्मिक लाभ आणि सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊया मंत्रांबाबतची माहिती...

देवशयनी एकादशी तिथीचा शुभारंभ 5 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6.58 वाजता होणार आहे तर 6 जुलैला रात्री 9.14 वाजता तिथी समाप्त होणार आहे. उदयातिथीनुसार 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाईल. 

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Devshayani Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व)

देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा? (Devshayani Ekadashi 2025 Mantra)

1. ॐ नमो भगवते वासुदेवाय
2. ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्॥
3. ॐ नमो नारायणाय
4. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।।
5. ॐ पद्मप्रियायै नमः
6. सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत सुप्तं भवेदिदम। विबुद्धे त्वयि बुध्येत जगत सर्वं चराचरम।।

Advertisement

देवशयनी एकादशी पूजन मुहूर्त 2025 (Devshayani Ekadashi Puja Muhurta 2025)

  • ब्रह्म मुहूर्त - पहाटे 4.08 वाजेपासून ते पहाटे 4.49 वाजेपर्यंत असेल  
  • अभिजित मुहूर्त - सकाळी 11.58 वाजेपासून ते दुपारी 12.54 वाजेपर्यंत असेल  
  • विजय मुहूर्त - दुपारी 2.45 वाजेपासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असेल  
  • गोधुली मुहूर्त - संध्याकाळी 7.21 वाजेपासून ते संध्याकाळी 7.42 वाजेपर्यंत असेल  
  • अमृत काळ - दुपारी 12.51 वाजेपासून ते दुपारी 2.38 वाजेपर्यंत  असेल  
  • त्रिपुष्कर योग - रात्री 9.14 वाजेपासून ते रात्री 10.42 वाजेपर्यंत असेल  
  • रवि योग - सकाळी 5.56 वाजेपासून ते रात्री 10.42  वाजेपर्यंत असेल  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)