
Devshayani Ashadhi Ekadashi 2025 Date And Time: देवशयनी एकादशी ही आषाढी एकादशी (Devshayani Ashadhi Ekadashi 2025), पद्म एकादशी आणि हरि शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीचा सोहळा रविवारी (6 जुलै) साजरा केला जाणार आहे. हा शुभ दिवस आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येतो आणि चातुर्मासाचीही सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा काळ, जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात. कार्तिक महिन्यामध्ये येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ते निद्रावस्थेतून बाहेर येतात, असे मानले जाते.
देवशयनी एकादशी कोणत्याही दिवशी आहे?
हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीचा शुभारंभ (Devshayani Ekadashi 2025 Date And Time) 5 जुलैला संध्याकाळी 6.58 वाजता सुरू होईल आणि 6 जुलैला रात्री 9.14 वाजता तिथी समाप्त होणार आहे. यानुसार यंदा 6 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी साजरी करण्यात येईल.
एकादशी तिथीचा शुभारंभ : 5 जुलै वेळ 06:58 वाजता
एकादशी तिथीची समाप्ती : 6 जुलै वेळ 09:14 वाजता
(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2025: 'दर्शन देरे...', भाविकांची रांग गोपाळपूरपर्यंत; एकादशीपूर्वीच विठ्ठल दर्शनासाठी 15 तासांचा कालावधी)
देवशयनी एकादशी महत्त्वाची का असते? (Devshayani Ekadashi 2025 Importance)
देवशयनी एकादशीचे (Devshayani Ashadhi Ekadashi 2025) महत्त्व पुराणांमध्ये विशेष स्वरुपात सांगण्यात आलंय. या दिवसापासून भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि संपूर्ण विश्वाची जबाबदारी भगवान शिवशंकर (Lord Shiva) यांच्यावर सोपवतात. म्हणूनच चातुर्मासामध्ये भगवान शिवाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या काळात तपश्चर्या, योगासने, मंत्र जप आणि धार्मिक विधी केल्याने पुण्य मिळते; असे म्हणतात.
(नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 : विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीला कारवाईचा इशारा)
विठ्ठल रुक्मिणीची कशी पूजा करावी? (Vitthal Rukmini Puja)
- पहाटे उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- घरातील देवघर आणि देवांच्या मूर्ती स्वच्छ करुन त्यांची पूजा करावी.
- विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. मूर्तीला स्वच्छ कपडे घालावे.
- तुळशीचा हार, फुले, फळे, नैवेद्य अर्पण करावा.
- आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा.
आषाढी एकादशी 2025 शुभ मुहूर्त
- ब्रह्म मुहूर्त - पहाटे 4.08 वाजेपासून ते पहाटे 4.49 वाजेपर्यंत
- अभिजित मुहूर्त - सकाळी 11.58 वाजेपासून ते दुपारी 12.54 वाजेपर्यंत
- विजय मुहूर्त - दुपारी 2.45 वाजेपासून ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत
- गोधुली मुहूर्त - संध्याकाळी 7.21 वाजेपासून ते संध्याकाळी 7.42 वाजेपर्यंत
- अमृत काळ - दुपारी 12.51 वाजेपासून ते दुपारी 2.38 वाजेपर्यंत
- त्रिपुष्कर योग - रात्री 9.14 वाजेपासून ते रात्री 10.42 वाजेपर्यंत
देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी? (Devshayani Ekadashi 2025 Puja)
- पहाटे उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे.
- चौरंगावर भगवान विष्णुची प्रतिमा स्थापित करा.
- भगवान विष्णुंना पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाची फुले-फळे, मिठाई, धूप-दीप आणि तुलसी जल अर्पित करा.
- 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.
- देवशयनी एकादशी व्रत कथेचे पठण करावे किंवा ते ऐकावे.
- व्रत संकल्प करा.
- गरजूंना दान करा.
- तामसिक गोष्टी कटाक्षाने टाळाव्या.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world