Dhanteras 2024: दीपावली म्हणजे दिव्यांचा सण... धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाचा शुभारंभ होतो. हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीमाता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. ज्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि लक्ष्मीमातेचीही कृपादृष्टी कायम राहते, असे म्हणतात. यंदा धनत्रयोदशी कधी आहे, कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावी आणि पूजा करावी? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया...
धनत्रयोदशी 2024 : खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त | Dhanteras Shopping Shubh Muhurt
यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी सकाळी 10.31 वाजता धनत्रयोदशीच्या तिथीचा शुभारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी (30 ऑक्टोबर) दुपारी 1.13 वाजेपर्यंत तिथी समाप्त होईल. या स्थितीमध्ये, उदया तिथीनुसार धनत्रयोदशीचा सण 29 ऑक्टोबरलाच साजरा करण्यात येईल.
खरेदी करण्यासाठी सकाळी 11.09 वाजेपासून ते दुपारी 1.22 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
दुसरा मुहूर्त : दुपारी 2:47 वाजेपासून ते संध्याकाळी 7:08 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
घरगुती सामानांची खरेदी करण्यासाठी रात्री 8:45 वाजेपासून ते संपूर्ण रात्रभर तुम्ही कधीही खरेदी करू शकता.
(नक्की वाचा: धनत्रयोदशीला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात?)
लक्ष्मी-कुबेर पूजनाची वेळ
धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:34 वाजेपासून ते संध्याकाळी 7:08 वाजेपर्यंत आहे. यादरम्यान लक्ष्मीमाता आणि कुबेर देवतेची पूजा करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी चौघडिया मुहूर्त पाहिला जात नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमाता आणि कुबेर देवतेची पूजा प्रदोष काळादरम्यान (Pradosh Kaal) करणे उत्तम मानले जाते.
सूर्यास्तानंतर सुरू होणारा काळ म्हणजे प्रदोष काळ. हा काळ संध्याकाळी 5:37 वाजेपर्यंत सुरू होणार असून 8:12 वाजेपर्यंत राहील. यानंतर वृषभ काळ संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 8:26 वाजेपर्यंत असेल. यादरम्यान तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)