दिवाळी पूजेदरम्यान लक्ष्मीमाता आणि गणेशमूर्ती या दिशेला का ठेवावी, जाणून घ्या कारण

Diwali 2024: दिवाळीची पूजा करताना लक्ष्मी माता आणि गणेशमूर्तीची योग्य दिशेला स्थापना करणे आवश्यक आहे. यामुळे कोणते शुभ फळ मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins

Diwali 2024: यंदा दिवाळी सणाचा शुभारंभ 31 ऑक्टोबरपासून होणार आहे. दिवाळी सणापूर्वी घराची साफसफाई करून सुंदर सजावट केली जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी माता आणि गणपती देवतेची विधीवत पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी लक्ष्मीमाता धरतीवर अवरते आणि आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते. या दिवशी लक्ष्मीमाता (Goddess Lakshmi) आणि गणपती बाप्पाची (Ganpati Bappa) पूजा केल्यास घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते; असे मानले जाते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी माता आणि गणेश मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते. पण या देवांच्या मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ ठरेल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

लक्ष्मीमातेचा घरात होईल प्रवेश, दिवाळीत दारी काढा सुंदर रांगोळी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व 

(नक्की वाचा: लक्ष्मीमातेचा घरात होईल प्रवेश, दिवाळीत दारी काढा सुंदर रांगोळी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व)

कोणत्या दिशेला ठेवावी लक्ष्मी माता आणि गणपतीची मूर्ती (Right Direction Of Idol Of Maa Laxmi And Lord Ganesha)

- दिवाळीच्या पूजेसाठी चौरंगावर गणेश मूर्ती आणि देवी लक्ष्मीमातेची मूर्ती स्थापन करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. 
- लक्ष्मीमातेची मूर्ती गणेश मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवावी. 
- डावीकडील स्थान हे पत्नीचे असल्याचे मानले जाते आणि लक्ष्मीमाता गणपती बाप्पाचे आईचे रूप आहे, असे म्हणतात. 
- म्हणूनच चौरंगावर गणपतीची मूर्ती डावीकडे आणि लक्ष्मीची मूर्ती उजवीकडे स्थापित करावी.
- लक्ष्मीमाता आणि गणपतीच्या मूर्तीचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे, हे लक्षात ठेवा.  

(नक्की वाचा: दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मीमाता-गणपती बाप्पाला अर्पण करा हे नैवेद्य)

गणपती आणि लक्ष्मीमातेची मूर्ती कशी असावी? (Idol Of Maa Laxmi And Lord Ganesha)

- लक्ष्मीमातेची मूर्ती आसनस्थ असावी. 
- लक्ष्मीमातेची मूर्ती कमळाच्या फुलावर आसनस्थ असावी.
- लक्ष्मीमातेची उभ्या अवस्थेत असलेली मूर्ती घरी आणली तर देवीचा निवास घरामध्ये राहत नाही, असे म्हणतात.  
- तसेच गणेशमूर्ती बसलेल्या स्थितीत असावी आणि सोंड डाव्या बाजूला असावी.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Topics mentioned in this article