कमी दरात दर्जेदार घरगुती वस्तू आणि दैनंदिन किराणा सामानाची खरेदी करायची म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांची पहिली पसंती डी-मार्टला (DMart) असते. वर्षभर विविध ऑफर्स आणि डिस्काउंटमुळे डी-मार्टमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच डी-मार्टमधील एका खास विभागात महिलांची प्रचंड गर्दी आणि खरेदीसाठी झुंबड पाहायला मिळत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक डी-मार्ट स्टोअर्समध्ये एक विशेष बदल पाहायला मिळतो. विशेषतः स्टोअरमधील तिसऱ्या मजल्यावरील विभागात रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीसाठी सजवण्यात आल्या आहेत. बाजाराच्या तुलनेत खूपच कमी आणि परवडणाऱ्या दरात राख्या मिळत असल्याने महिला या विभागात मोठी गर्दी करत आहेत.
डी-मार्टमध्ये यंदा रंगीबेरंगी, नवनवीन डिझाइन्सच्या राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी कार्टून राख्या, महिलांसाठी लुंबा राख्या आणि पारंपरिक डिझाईनच्या राख्यांचा मोठा संग्रह उपलब्ध आहे. अनेक महिला महिन्याभराचा किराणा आणि घरगुती साहित्य खरेदी करण्यासोबतच रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्यांची खरेदीही एकाच वेळी करून घेतात. राख्यांव्यतिरिक्त भावासाठी गिफ्ट पॅक्स, चॉकलेट्स, मिठाई, पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंवरही आकर्षक डिस्काउंट दिले जात आहेत.
त्यामुळे एकाच छताखाली रक्षाबंधनाच्या तयारीचे सर्व साहित्य उपलब्ध होत असल्याने महिला डी-मार्टला सर्वाधिक पसंती देत आहेत. ऑगस्ट महिन्यातच रक्षाबंधन आहे. त्यामुळे या निमित्ताने खास करून महिला राख्या खरेदी करण्यासाठी डी मार्टमध्ये गर्दी करत आहेत. त्यांना हव्या त्या राख्या आणि हव्या तशा डिझाईनच्या राख्या इथं मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा ओढा डीमार्टकडे दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world