- पावसाळ्यात रेनकोट, शूज, बॅग्स आणि ट्रेंडी कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून केली जाते
- टाटा समूहाचा झुडिओ स्टोअर पावसाळी वस्तू स्वस्त दरात पुरवून ग्राहकांची पसंती मिळवत आहे
- झुडिओमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी वॉटरप्रूफ शूज 299 रुपयांपासून उपलब्ध आहेत
पावसाळ्यात खरेदी म्हटल्यावर अनेक जण रेनकोट, शूज, बॅग्स आणि ट्रेंडी कपड्यांची मागणी असते. ते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक बाहेर पडत असतात. सध्या जरी पावसानी उघडीक घेतली असली तरी पावसाळी वस्तूंच्या खरेदीवर काही परिणाम झालेला दिसत नाही. ग्राहक कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू कुठे भेटतील याचा शोध घेत असतात. अशा वेळी कपडे आणि फॅशन अॅक्सेसरीजसाठी अनेक ग्राहक डी-मार्टकडे जातात. पण त्यांना आत आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. तिथे त्यांना डी मार्ट पेक्षा ही स्वस्त दरात या वस्तू उपलब्ध होत आहेत.
टाटा समूहाच्या ‘झुडिओ' (Zudio) स्टोअरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. तिथे अनेक वस्तू खुपच स्वस्त दरात मिळत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठीच्या विविध वस्तू येथे अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. झुडिओमध्ये सध्या पावसाळ्यासाठी विशेष कलेक्शन आली आहेत. महिला आणि पुरुषांसाठीच्या वॉटरप्रूफ पावसाळी शूजला मागणी जास्त आहे. हे शुज 299 रुपयापासून मिळत आहेत. लहान मुलांसाठी आकर्षक चपलांही आहेत. त्या तर 149 रुपयांपासून सुरू होता. तर 399 रुपयांपर्यंत चांगल्या चपला ही उपलब्ध आहेत.
याशिवाय, पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या स्टायलिश आणि मजबूत बॅग्स 199 ते 399 रुपयांच्या दरात मिळत आहेत. फॅशनप्रेमींसाठी येथे टी-शर्ट्सचे आकर्षक कलेक्शन आहेत. त्यांची किंमत 145 रुपयांपासून सुरू होते. लहान मुलांचे कॅज्युअल कपडे 149 रुपयांपासून तर महिलांचे डिझायनर कुर्ते 299 रुपयांपासून मिळत आहेत. यासोबतच लिपस्टिक, काजळ, फाउंडेशन आणि नेलपेंटसह विविध ब्यूटी प्रॉडक्ट्सही अत्यंत कमी किमतीत मिळतात. या सर्व वस्तू एकाच ठिकाणी या स्टोअरमध्ये मिळत आहेत. दररोज बदलणाऱ्या नवीन कलेक्शनमुळे या स्टोअर्समधील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
सर्व सामान्य मध्यमवर्गीय डी मार्टला आपली पहिली पसंती देत असतात. त्यामुळे डी मार्टमध्ये नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र डी मार्टला काही पर्याय आहे का याची ही चाचपणी ग्राहक करत असतात. त्यामुळे कपडे आणि सौंदर्य प्रसादने, शुज यासाठी आता ग्राहक झुडिओकडे वळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सिजनमध्ये झुडियोत अनेक जण खरेदीसाठी जात असल्याचं दिसत आहे. याला मुख्य कारण तिथे असलेल्या स्वस्त आणि मस्त वस्तू असल्याचं सांगितलं जात आहे.