- उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे आगामी काळात एकत्र येऊ शकतात, असा भाकीत व्यक्त करण्यात आलं आहे
- उद्धव ठाकरे यांचे हनुमान चालीसाला विरोध केल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पद गेले असल्याचा दावा राणांनी केला
- उद्धव ठाकरे आता राम भगवान आणि बजरंगबली यांच्या विचारांकडे परत येत आहेत असं ही ते म्हणाले
राजकारणात काही अशक्य नसतं. त्यामुळे राजकारणात कोणी ही कायमचा शत्रू आणि कोणी ही कायमचा मित्र ही नसतो हेच खरे म्हणायला हवे. सध्या राज्यातील राजकारणा वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच काही वेगवेगळी समिकरणांची चर्चा ही सुरू झाली आहे. त्यातच भाजप प्रणित NDA मधील एका नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे ही आगामी काळात एकत्र येऊ शकतात असे भाकीत व्यक्त केले आहे. शिवाय पवार कुटुंबात काय होईल हे ही सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आगामी काळात एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य अमरावतीच्या बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी केले आहे. त्यांच्या या भाकीताने एकच खळबळ उडाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नाही असं ही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हनुमान चालीसाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले होते असं राणा म्हणाले. शिवाय त्यांनाच्या जवळ आमदार- खासदार ही राहीले नाहीत. ते ही त्यांना मोठ्या संख्येने सोडून गेले असं ही राणा यांनी सांगितलं.
मात्र आता त्यांच्यात बदल झाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा हनुमान चालीसा हातात घेतली आहे. 18 तारखेला ते नागपूर येथील राम मंदिरात येत आहेत. तिथे ते हनुमान चालीसा बोलणार आहेत. ठाकरे आता राम भगवान आणि बजरंगबली यांच्या विचारांकडे परत येत आहेत असं राणा म्हणाले. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील असे चित्र पाहायला मिळू शकते असा तर्क राणा यांनी लावला आहे. राणा दाम्पत्य हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करण्यात पुढे असतात. टीका करण्याची संधी ते सोडत नाही. अशामध्ये हे वक्तव्य आले आहे.
एकीकडे त्यांनी शिवसेनेच्या एकबाबत वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आगामी वाटचालीवर ही भाष्ट केलं आहे. ते म्हणाले की आगामी 15 दिवसांत सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होती. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी असेल, असे ही त्यांनी सांगितले आहे. राणा यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळी हालचाल पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world