- टी-शर्टचा नाव त्याच्या आकारावरून आले आहे, जे सपाट पसरवल्यावर इंग्रजीतील T अक्षरासारखे दिसते
- १९ व्या शतकाच्या शेवटी टी-शर्टचा जन्म अंतर्वस्त्र म्हणून झाला आणि ते मुख्यतः मजूर आणि सैनिक वापरत होते
- अमेरिकन नौदलाने १९१३ मध्ये टी-शर्टला अधिकृत युनिफॉर्मचा भाग म्हणून स्वीकारले, ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली
दैनंदिन जीवनात आबालवृद्धांकडे हमखास आढळणारा कपडा म्हणजे टी-शर्ट. पण या टी-शर्टमधील 'T' चा अर्थ काय, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? नाही ना. अनेकदा लोक याला एखाद्या मोठ्या शब्दाचे शॉर्ट फॉर्म समजतात. मात्र, या 'T' चा संबंध कोणत्याही शब्दाशी नसून त्याच्या आकाराशी आहे. जेव्हा एखादा टी-शर्ट सपाट जागेवर पसरवून ठेवला जातो, तेव्हा त्याचा आकार इंग्रजीतील 'T' या अक्षरासारखा दिसतो. याच विशिष्ट आकारामुळे या कपड्याला 'T-Shirt' हे नाव मिळाले. ही बाब अनेक लोकांना माहित नाही.
आधुनिक टी-शर्टचा इतिहास पाहिला तर 19 व्या शतकाच्या शेवटी याची सुरुवात एक 'अंडरगारमेंट' (अंतर्वस्त्र) म्हणून झाली होती. सुरुवातीला मजूर, खाणकामगार आणि नौदलातील सैनिक हे कपडे वापरत असत. कारण ते वजनाने हलके आणि अत्यंत आरामदायक होते. पुढे जाऊन 1913 मध्ये अमेरिकन नौदलाने (US Navy) याला अधिकृत युनिफॉर्मचा भाग बनवले. या निर्णयामुळे टी-शर्टची लोकप्रियता झपाट्याने वाढली. अनेक लोक शर्ट ऐवजी टी शर्टला प्राधान्य देवू लागले. टी शर्ट घालायला सोपा आणि वावरताना ही आरामदायी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
1950 च्या दशकात टी-शर्ट केवळ घालण्याचा कपडा राहिला नाही. हॉलीवूडपट आणि तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये टी-शर्ट परिधान केल्यामुळे तरुणांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. हळूहळू ते फॅशनचे मुख्य प्रतीक बनले. आज बाजारात राउंड नेक, व्ही-नेक, पोलो आणि ग्राफिक प्रिंटेड अशा विविध प्रकारांमध्ये टी-शर्ट उपलब्ध आहेत. ते प्रत्येक वयोगटातील लोकांची पहिली पसंती बनले आहेत. त्यामुळे कमी वेळात टी शर्ट झपाट्याने फेमस झाले. आज जगातील कोणत्या ही काना कोपऱ्यात तुम्हाल टी शर्ट पाहायला मिळतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world