Do You Know: टी-शर्टमधील 'T' चा नेमका अर्थ काय? वाचा टी शर्टचा रंजक इतिहास, तुम्ही ही म्हणाल क्या बात है

त्यामुळे कमी वेळात टी शर्ट झपाट्याने फेमस झाले. आज जगातील कोणत्या ही काना कोपऱ्यात तुम्हाला टी शर्ट पाहायला मिळतील.

जाहिरात
Read Time: 2 mins

दैनंदिन जीवनात आबालवृद्धांकडे हमखास आढळणारा कपडा म्हणजे टी-शर्ट. पण या टी-शर्टमधील 'T' चा अर्थ काय, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? नाही ना. अनेकदा लोक याला एखाद्या मोठ्या शब्दाचे शॉर्ट फॉर्म समजतात. मात्र, या 'T' चा संबंध कोणत्याही शब्दाशी नसून त्याच्या आकाराशी आहे. जेव्हा एखादा टी-शर्ट सपाट जागेवर पसरवून ठेवला जातो, तेव्हा त्याचा आकार इंग्रजीतील 'T' या अक्षरासारखा दिसतो. याच विशिष्ट आकारामुळे या कपड्याला 'T-Shirt' हे नाव मिळाले. ही बाब अनेक लोकांना माहित नाही. 

नक्की वाचा - Trending News: मोबाईलमध्ये सेल्फी काढत असाल तर सावधान! तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं, चोरीचा नवा फंडा

आधुनिक टी-शर्टचा इतिहास पाहिला तर 19 व्या शतकाच्या शेवटी याची सुरुवात एक 'अंडरगारमेंट' (अंतर्वस्त्र) म्हणून झाली होती. सुरुवातीला मजूर, खाणकामगार आणि नौदलातील सैनिक हे कपडे वापरत असत. कारण ते वजनाने हलके आणि अत्यंत आरामदायक होते. पुढे जाऊन 1913 मध्ये अमेरिकन नौदलाने (US Navy) याला अधिकृत युनिफॉर्मचा भाग बनवले. या निर्णयामुळे टी-शर्टची लोकप्रियता झपाट्याने वाढली. अनेक लोक शर्ट ऐवजी टी शर्टला प्राधान्य देवू लागले. टी शर्ट घालायला सोपा आणि वावरताना ही आरामदायी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. 

Advertisement

नक्की वाचा - ​'Bank'ला हिंदीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही याचं उत्तर, जाणून घ्या काय आहे तो शब्द

1950 च्या दशकात टी-शर्ट केवळ घालण्याचा कपडा राहिला नाही. हॉलीवूडपट आणि तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये टी-शर्ट परिधान केल्यामुळे तरुणांमध्ये त्याची प्रचंड क्रेझ निर्माण झाली. हळूहळू ते फॅशनचे मुख्य प्रतीक बनले. आज बाजारात राउंड नेक, व्ही-नेक, पोलो आणि ग्राफिक प्रिंटेड अशा विविध प्रकारांमध्ये टी-शर्ट उपलब्ध आहेत. ते प्रत्येक वयोगटातील लोकांची पहिली पसंती बनले आहेत. त्यामुळे कमी वेळात टी शर्ट झपाट्याने फेमस झाले. आज जगातील कोणत्या ही काना कोपऱ्यात तुम्हाल टी शर्ट पाहायला मिळतील. 
 


Topics mentioned in this article