जाहिरात

तुम्हीही शिल्लक चपात्या फ्रिजमध्ये ठेवता? स्वत:च्या आरोग्याशी खेळू नका, किती तासांपर्यंत खाऊ शकता?

फ्रिजमध्ये ठेवलेल्या चपात्या किती काळापर्यंत चांगल्या टिकतात हे तुम्हाला माहीत आहे का?

तुम्हीही शिल्लक चपात्या फ्रिजमध्ये ठेवता? स्वत:च्या आरोग्याशी खेळू नका, किती तासांपर्यंत खाऊ शकता?
NDTV

भारतीय घरांमध्ये दुपारी किंवा रात्रीच्या वेळी दोन-चार चपात्या शिल्लक राहतात. आपल्यातील बहुतांश जण या चपात्या एका डब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेल्या चपात्या किती काळापर्यंत चांगल्या टिकतात हे तुम्हाला माहीत आहे का? अशा चपात्या खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचं काही नुकसान तर होत नाही ना? शिळ्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवण्यासंदर्भातील काही नियम जाणून घेऊया. 

चपात्या फ्रिजमध्ये किती काळ टिकतात?

सर्वसाधारणपणे फ्रिजमध्ये ठेवलेल्या चपात्या २४ ते ४८ तासांच्या आत खायला हव्या. काही जण तर ३ ते ४ दिवसही चपात्या फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र आरोग्यासाठी ही बाब धोकादायक आहे.

Latest and Breaking News on NDTV

​चपात्या फ्रिजमध्ये ठेवताना काय काळजी घ्याल?

1 हवाबंद डब्बा - चपात्या कधीही उघड्या ठेऊ नयेत, या चपात्या एका स्वच्छ आणि हवाबंद डब्यात ठेवाव्यात. 

२ थंड करून फ्रिजमध्ये ठेवा - कधीही गरम गरम चपात्या फ्रिजमध्ये ठेऊ नये. आधी चपात्या खोलीच्या तापमानावर येऊ द्याव्यात, त्यानंतर हवाबंद डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा. 

३ चांगल्या प्रकारे गरम करा - फ्रिजमध्ये चपात्या बाहेर काढल्यानंतर तव्यावर थोडं गरम करा. यासाठी पाणी शिंपडावं किंवा तेल-तूप लावावं. यामुळे चपात्या सॉफ्टही होतात आणि त्यावरील बॅक्टेरिया मरतात. 

रिसर्च काय सांगतं? 

एका अभ्यासानुसार, फ्रिजमध्ये थंड तापमानात स्टार्चचं क्रिस्टलायजेशन (कडक होणं) सुरू असतं. ज्यामुळे ४८ तासांनंतर अन्नाची गुणवत्ता आणि पचनक्षमता खालावू लागते.

शिळ्या चपात्या आरोग्यासाठी त्रासदायक?

पोटाचे आजार - ४८ तासापेक्षा शिळ्या चपात्या खाल्ल्याने फूड पॉइजनिंग, पोटदुखी, उलट्या आणि जुलाबसारखे त्रास उद्भवू शकतात. 

पोषक तत्व - फ्रिजमध्ये बराच काळ ठेवल्यामुळे चपात्यात आवश्यक पोषकतत्वं आणि फायबर संपुष्टात येऊ लागतं. 

पचनात अडचणी - शिळी असल्यामुळे चपातीतील स्टार्टच संपतं. अशी चपाती पचविण्यासाठी पोटाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास वाढतो. 


 

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com