Adverse effects of cold beer : पॅरीसमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी लावण्यात आली आहे. यामागे आरोग्याचं कारण देण्यात आलं आहे. दारू प्यायल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतो. दारूच्या सेवनाने किडनीला काम करण्यासाठी दबाव येतो. यामुळे याला मूत्रवर्धक म्हटलं आहे. याचा अर्थ असा की ते मूत्रपिंडांना किंवा किडनीला अधिक मूत्र तयार करण्यास उत्तेजित करतं. हे व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनला दाबून टाकतं, जो सामान्यतः शरीराला पाणी टिकवून ठेवण्याचा आदेश देत असतो. भीषण उकाड्यात जेव्हा शरीर आधीच शरीर थंड ठेवण्यासाठी कित्येक लिटर द्रव्य पदार्थ घामाच्या रुपात बाहेर टाकत असतं, अशावेळी दारूचा त्यावर गंभीर परिणाम होता. यामुळे शरीर डिहायड्रेट होतं.
पॅरीसमध्ये काही दिवसांपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. मात्र भारतात हे नियम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
उन्हाळ्यात लोक थंड पदार्थांचं सेवन करतात आणि द्रव्य पदार्थ पिण्याकडे अधिक कल असतो. जोपर्यंत थंड पाणी किंवा ड्रिंक्स घेत नाहीत तोपर्यंत तहान भागत नसल्याचं अनेकांना वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का, थंड दारू किंवा बियरमुळे तहान भागविण्याऐवजी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर येते. विशेषत: जेव्हा तुम्ही थंड बियर पिता, तेव्हा याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
थंड बियर प्यायल्याने काय होतं? (What happens when you drink cold beer?)
डॉक्टर समीर भाटी यांनी सांगितलं की, अनेकजणांना असं वाटतं की, उकाडा आहे आणि जर व्हिस्की किंवा व्होडका न पिता थंड बियर प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. बियर थंड असते, ज्यामुळे गरम होणार नाही असा विचार तर अत्यंत चुकीचा आहे. थंड बियर प्यायल्याने शरीरावर याचा थेट परिणाम होतो. थंड बियर प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होतं. याचा अर्थ शरीरातून अतिरिक्त पाणी बाहेर निघतं आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ थंड बियरच नाही तर कॉफीचं सेवनामुळेही शरीरावर असाच परिणाम होतो.
शरीर डिहायड्रेट झाल्यावर काय संकेत मिळतात? (What are the signs of dehydration?)
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहायड्रेशन होतं. वारंवार तहान लागणे, तोंड कोरडं होणं, गडद रंगाची लघवी होणं, लघवी कमी होणं, थकवा, चक्कर येणं आणि डोकेदुखी सारखी लक्षणं दिसतात.
स्वत:चा बचाव कसा कराल? (How to Prevent Dehydration)
डॉक्टर समीर भाटी यांनी सांगितलं...
- उन्हाळ्यात डिहायड्रेशनहून स्वत:चा बचाव करण्यासाठी दारूचं सेवन करू नये.
- पार्टीत जात असाल तर अल्कोहोलपासून दूर राहा.
- कॉफीचंही अधिक सेवन करत असाल तर ते कमी करा, यातूनही शरीरातून अतिरिक्त पाणी बाहेर येतं.
- पाण्यात मीठ घालून प्या.
- नारळ पाणी प्या.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world