जाहिरात

Durga Ashtami March 2026: दुर्गा अष्टमी कधी आहे, 25 की 26 मार्चला? जाणून घ्या अचूक तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त

Durga Ashtami March 2026 Date and Time: चैत्र महिन्यातील नवरात्रौत्सवातील यंदा अष्टमी तिथी कधी आहे? काय आहे अचूक तारीख आणि कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

Durga Ashtami March 2026: दुर्गा अष्टमी कधी आहे, 25 की 26 मार्चला? जाणून घ्या अचूक तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त
"Durga Ashtami March 2026 Date and Time: दुर्गा अष्टमी 2026 कधी आहे?"

Durga Ashtami March 2026 Date and Time: हिंदू पंचांगानुसार सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गामातेच्या नऊ रूपांची विधीवत पूजा केली जाते. यामध्ये नवरात्रीचा आठवा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो, ज्यास अष्टमी आणि महाष्टमी असेही म्हटले जाते. या दिवशी दुर्गामातेचे आठवे स्वरूप महागौरी मातेची पूजा करण्याचा विधी आहे. पण यावर्षी महाष्टमीच्या तिथीबाबत लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. चिंता करू नका या लेखाद्वारे आपण दुर्गा अष्टमीची अचूक तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया... 

25 मार्च की 26 मार्च, कधी साजरी केली जाईल दुर्गा अष्टमी?

वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात 25 मार्च रोजी दुपारी 1 वाजून 52 मिनिटांनी होऊन समाप्ती 26 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनी होईल. अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार दुर्गा अष्टमीचा सण 26 मार्च 2026, गुरुवार रोजी साजरा केला जाईल.

दुर्गा अष्टमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे?

दुर्गा अष्टमीच्या सणाला कन्या पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी कन्यांची पूजा केली जाते आणि त्यांना भोजन दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने दुर्गामाता भाविकांवर आपली कृपा कायम ठेवते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. जाणून घेऊया शुभ मुहूर्त...

  1. पहिला शुभ मुहूर्त: सकाळी 6.18 वाजेपासून ते सकाळी 7.50 वाजेपर्यंत आहे.  
  2. दुसरा शुभ मुहूर्त: सकाळी 10.55 वाजेपासून ते दुपारी 3.31 वाजेपर्यंत आहे. 
(नक्की वाचा: Ram Navami 2026: राम नवमी कधी साजरी करावी? 26 की 27 मार्च? जाणून घ्या अचूक तारीख, मध्यान्ह काळ आणि शुभ मुहूर्त)
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

दुर्गा अष्टमी महागौरी मातेची आरती

जय महागौरी जगत की माया।
जया उमा भवानी जय महामाया।।

हरिद्वार कनखल के पासा।
महागौरी तेरा वहां निवासा।।

चंद्रकली और ममता अंबे।
जय शक्ति जय जय मां जगदंबे।।

भीमा देवी विमला माता।
कौशिकी देवी जग विख्याता।।

हिमाचल के घर गौरी रूप तेरा।
महाकाली दुर्गा है स्वरूप तेरा।।

सती 'सत' हवन कुंड में था जलाया।
उसी धुएं ने रूप काली बनाया।।

बना धर्म सिंह जो सवारी में आया।
तो शंकर ने त्रिशूल अपना दिखाया।।

तभी मां ने महागौरी नाम पाया।
शरण आनेवाले का संकट मिटाया।।

शनिवार को तेरी पूजा जो करता।
मां बिगड़ा हुआ काम उसका सुधरता।।

भक्त बोलो तो सोच तुम क्या रहे हो।
महागौरी मां तेरी हरदम ही जय हो।।

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com