Dussehra 2025: दसऱ्याचे 10 महाउपाय, सोन्यासारखे चमकेल भाग्य आणि रखडलेली कामं पटकन होतील पूर्ण

Dussehra 2025 Astro Tips: हिंदू धर्मामध्ये विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी कोणते उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होतील आणि इच्छा पूर्ण होतील? हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Dussehra 2025: दसऱ्या दिवशी करा हे 10 महाउपाय"
Canva

Dussehra 2025 Astro Tips: भारतीय संस्कृतीतमध्ये दसरा केवळ एक सण नाहीय तर अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा सण साजरा केला जातो. या दिवशी श्री रामाने रावणाचा तर दुर्गामातेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणूनच या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी कोणते उपाय केल्यास जीवनातील संकटं-अडथळे दूर होऊन सुख-शांती, समृद्धी प्राप्त होईल, याबाबत प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. नीती एस. शर्मा यांनी सांगितलेली उपाय जाणून घेऊया...

दसऱ्याचे 10 महाउपाय, दूर होतील संकटं आणि उजळेल भाग्य

1. शत्रू आणि अडचणींपासून मुक्तता मिळवण्यासाठी 'शमी पूजा आणि तिलक' उपाय

दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली दैवी शस्त्रं शमीच्या वृक्षावर ठेवली होती आणि विजय प्राप्त करुन शस्त्रं परत घेतली होती. 

उपाय : शमी वृक्षास जल, हळद-कुंकू आणि फुलं अर्पण करुन "ॐ शं शमाय नमः" मंत्राचा 108 वेळा जप करा. शत्रू, कोर्टाशी संबंधित अडथळे दूर होतील. 

2. कर्ज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी रावण दहनावेळेस विशेष मंत्राचा जप 

रावण दहनावेळेस "ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः" मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन धनलाभाचे द्वार उघडू शकतात.

Advertisement

3. करिअर आणि यशासाठी शस्त्र पूजा 

दसऱ्या दिवशी शस्त्रांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. तुमची यंत्रं, पेन, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा व्यावसायिक साधनांवर केसर-चंदनाचा टिळा लावा. हा उपाय केल्यास करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती होण्यास मदत मिळेल.   

4. मुलं आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी सीता-राम नाम जप 

श्रीराम आणि माता सीता यांच्या नावाचा जप करणे फलदायी ठरेल. "सीता राम सीता राम जय जय राम" या नामाचा 108 वेळा जप केल्यास कुटुंबामध्ये शांती, सुख-समाधान नांदेल. 

Advertisement

5. ग्रह दोष शांतीसाठी दुर्गा सप्तशती पठण

दसरा सण दुर्गामातेच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या कोणत्याही एका अध्यायाचे पठण केल्यास ग्रहांचे नकारात्मक प्रभाव दूर होतील. विशेषतः शनी, राहु आणि केतुचे दोष कमी होण्यास मदत मिळेल. 

Advertisement

(नक्की वाचा: Happy Dussehra Wishes 2025: सत्य, शौर्य आणि विजयाचा उत्सव ; दसऱ्याच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा)

6. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी गुग्गुल धूप हवन 

संध्याकाळच्या वेळेस गुग्गुल आणि गाईच्या तुपापासून धूप किंवा लघु हवन करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

7. अडकलेली काम पटकन होण्यसाठी विजय तिलक उपाय

दसऱ्या दिवशी केसर, हळद आणि चंदन एकत्रित करुन त्याचा टिळा कपाळावर लावा. यामुळे रखडलेली काम पूर्ण होण्यास मदत मिळेल. 

Photo Credit: PTI

8. जीवनात सन्मान आणि पदोन्नतीसाठी पिंपळाच्या झाडाजवळ दीप प्रज्वलित करा

संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावून "ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्रांचा 108 वेळा जप करा. सरकारी काम, पदोन्नती आणि सन्मान यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.

9. वैवाहिक जीवनात गोडवा येण्यासाठी राम-सीता प्रतीक पूजा करा.

दसऱ्याच्या दिवशी श्रीराम आणि सीता मातेची पूजा करा. लग्नामध्ये काही अडचणी येत असतील श्री राम-सीतामातेच्या प्रतिमेसमोर चित्रासमोर एकत्रित उभे राहून संकल्प करा आणि "ॐ श्री सीता रामाभ्यां नमः" या मंत्राचा जप करा. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि स्थैर्य  लाभेल.

 

(नक्की वाचा :Happy Dussehra 2025 Wishes: रावण नव्हे रामासारखे वागण्याची प्रतिज्ञा घ्या, दसरा सणाच्या खास शुभेच्छा पाठवा)

10.  नवीन कार्य आणि भाग्योदयासाठी विजय मुहूर्तामध्ये संकल्प करा

दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावर नवीन काम, व्यवसाय, जमीन खेरदी किंवा प्रकल्प हाती घेतल्यास अत्यंत शुभ फळ मिळतील. या प्रयत्नांमुळे दीर्घकालीन यश मिळते, असे म्हणतात.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)