जाहिरात

Happy Dussehra Wishes 2025: सत्य, शौर्य आणि विजयाचा उत्सव ; दसऱ्याच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Happy Dussehra Wishes 2025 In Marathi: आनंदाचा, उमेद देणारा आणि नवा आरंभ करणाऱ्या दसऱ्या दिवशी सर्वांनाच यश, आरोग्य आणि समाधान लाभो; विजयादशमीच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा.

Happy Dussehra Wishes 2025: सत्य, शौर्य आणि विजयाचा उत्सव ; दसऱ्याच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
"Happy Dussehra Wishes 2025 In Marathi: विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा"
Canva

Happy Dussehra Wishes 2025 In Marathi: दसरा म्हणजे हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण. आश्विन महिन्याच्या दशमी तिथीला दसरा सण साजरा केला जातो. हा दिवस विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. "सत्याचा असत्यावर विजय" आणि "चांगुलपणाचा वाईटावर विजय" याचे प्रतीक म्हणजे विजयादशमी. दसरा सणानिमित्त कुटुंबीय, नातेवाईकांसह प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश...

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा| विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा| Dussehra Wishes In Marathi | Happy Dussehra 2025  

1. रावणावर रामाचा विजय 
सत्य आणि धर्माचा हाच संदेश 
दसऱ्या दिवशी करू प्रार्थना 
सदैव होवो जीवनात आनंदाची यशप्राप्ती!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Dussehra 2025

2. दसऱ्याचा सोहळा आला 
दसरा म्हणजे धर्म, शौर्य यांचं प्रतीक 
शुभ दसरा!

3. फुलांनी सजली रांगोळी 
घरात आला आनंद
यशस्वी होवो तुमचा प्रत्येक प्रयत्न 
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!  
Happy Dussehra 2025

4. सण आला विजयाचा 
घेऊ प्रेरणा श्री रामाची 
सदैव वाईटावर मिळवा विजय
याच दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा!
शुभ विजयादशमी 2025 !

5. रावणदहनाचा दिवस आला
जळो वाईट विचार, राहो सदाचार
सत्यासाठी लढायचं ठरवू
दसरा आनंदात करू साजरा
शुभ विजयादशमी 2025!
Happy Dussehra 2025

Happy Dussehra 2025 Wishes: रावण नव्हे रामासारखे वागण्याची प्रतिज्ञा घ्या, दसरा सणाच्या खास शुभेच्छा पाठवा

(नक्की वाचा: Happy Dussehra 2025 Wishes: रावण नव्हे रामासारखे वागण्याची प्रतिज्ञा घ्या, दसरा सणाच्या खास शुभेच्छा पाठवा)

6. धर्म, पराक्रम आणि विजय
सत्याच्या मार्गावर चालूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

7. रावण फक्त बाहेरचा नाही 
मनातला वाईटपणाही नष्ट करा
दसऱ्याला ठरवू मन शुद्ध करायचं
सत्याच्या प्रकाशात जीवन जगायचं!

8. शौर्याचा, विजयाचा सण आला
प्रत्येक मन आनंदाने न्हाले
यश आणि समाधान लाभो सदा!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Dussehra 2025

9. रामाची होवो कृपा
सत्याचं लाभो बळ
दसऱ्याच्या दिवशी हसत राहा सदा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. शस्त्र पूजन, रावण दहन
सण दसऱ्याचा देतो नवचरण
सदैव मिळो प्रगतीचा मार्ग 
जीवनात होवो कायम भरभराट
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

11. दसऱ्याला नवसंकल्प करू
वाईटाला दूर सारू
सत्य, प्रेम आणि सद्विचार
हेच ठेवू जीवनात सार!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

12. दसऱ्याच्या शुभदिनी
सदैव होत राहो तुझी प्रगती
विचार असो नेहमी सकारात्मक
शुभेच्छा तुझ्या यशस्वी जीवनासाठी!

13. जसा राम जिंकला रावणावर
तसंच आपणही जिंकू वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर 
कायम यश मिळो जीवनभर
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com