Explainer : ओव्हरवेट, अंडरवेट की लठ्ठ, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता? संपूर्ण गणित समजून घ्या, कुठे चूक करताय का?

लठ्ठपणा नेमका काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता हे देखील तपासून पाहा. अशातूनच या समस्येला तोंड देता येईल.

जाहिरात
Read Time: 3 mins

All About Obesity: सद्यस्थितीत जगभरात लठ्ठपणा ही एक समस्या बनली आहे. परंतु भारतात ही परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. धावपळीचे जीवन, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा सामान्य झाला आहे. यातून केवळ शरीराचा आकारच वाढत नाही तर गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं. लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो, मात्र त्याबाबत लोक उदासीन असल्याचं दिसून येतं. त्यामुळे लोकांना बारीक तर व्हायचं असतं मात्र त्यांना योग्य दिशा आणि पद्धत माहिती नसते. अशात सर्वात आधी लठ्ठपणा नेमका काय आहे हे जाणून घ्यायला हवं. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत येता हे देखील तपासून पाहा. अशातूनच या समस्येला तोंड देता येईल.



लठ्ठपणा काय आहे? (What Is Obesity)


शरीरात अतिरिक्त फॅट जमा झाल्याने लठ्ठपणा येतो. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजमवर परिणाम होता आणि अनेक रोगांचं मूळ ठरू शकतं. लठ्ठपणा केवळ सुंदरतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही तर हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, आर्थरायटिस, कर्करोगसारख्या आजारांचं कारण ठरू शकतं. 

Advertisement

तुम्ही लठ्ठ आहात हे कसं कळेल?
बरेच लोक फक्त वजनावरून ते लठ्ठ आहेत की नाही हे गृहीत धरतात. परंतु ही पद्धत अचूक नाही.  तुमच्या शरीराच्या उंचीनुसार तुमचे वजन किती असावे हे पाहणे महत्त्वाचे आहे. येथे बीएमआय महत्त्वाची भूमिका बजावते.

बीएमआई काय आहे?
बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) हा एक पॅरामीटर आहे. जो उंची आणि वजनाच्या आधारावर तुम्ही वजन कमी आहे की जास्त की लठ्ठ आहात हे सांगते. ही एक गणना आहे, परंतु लठ्ठपणाच्या स्थितीचा अंदाजे अंदाज देण्यासाठी ती खूप उपयुक्त आहे.

बीएमआय किती महत्त्वाचा?
बीएमआयचा उपयोग डॉक्टर लठ्ठपणासंबंधित जोखीम समजून घेण्यासाठी केला जातो. हा एक इंडिकेटर आहे, जो शरीरात किती फॅट आहे हे सांगतं. हा हेल्थ प्लान तयार करणे, डाएट प्लान तयार करणे आणि आजारांचा धोका ओळखण्यास मदत होते. 

Advertisement

बीएमआय कसा तपासतात?
BMI = वजन (किलोग्रॅममध्ये) ÷ (मीटरमध्ये उंची)^2

उदाहरण: जर एखादी व्यक्ती १.७० मीटर उंच असेल आणि तिचे वजन ७० किलोग्रॅम असेल, तर त्याचा BMI असेल:

BMI = ७० / (१.७०)^२ = ७० / २.८९ = २४.२२

हे सोप्या पद्धतीने समजून घेऊया: जर एखादी व्यक्ती १.७० मीटर उंच असेल आणि त्य वजन ७० किलोग्रॅम असेल, तर त्याचा BMI असेल:

Advertisement

प्रथम लांबीचा वर्ग शोधा → (१.७० × १.७०) = २.८९

नंतर वजनाला या संख्येने भागा → ७० ÷ २.८९ = २४.२२

BMI चा अर्थ काय आहे?
१८.५ पेक्षा कमी → कमी वजन
१८.५ - २४.९ → सामान्य वजन
२५ - २९.९ → जास्त वजन
३० किंवा त्याहून अधिक → लठ्ठपणा

BMI चा फॉर्म्युला किती योग्य आहे?
बीएमआय लठ्ठपणा मोजण्याचा सोपा आणि झटपट पर्याय असला तरी हा शंभर टक्के योग्य नाही. वजन आणि उंचीच्या आधारावर याची मोजणी केली जाते. ते शरीरातील स्नायू आणि चरबीचं प्रमाण दर्शवत नाही. एखाद्या खेळाडूचा बीएमआय जास्त असू शकतो, परंतु त्याच्याकडे चरबी कमी आणि स्नायू जास्त असू शकतात. त्यामुळे बीएमआय हे अंतिम सत्य असू शकत नाही. 

भारतीय कुठे चूक करतात?
भारतीय समाजात खाण्याला प्रेम आणि संस्कृतीचा भाग मानलं जातं. घरातील स्वयंपाक घरापासून लग्न आणि उत्सवांमध्ये दररोज तेलकट, मीठ आणि अधिक कार्बोहायड्रेटचे खाद्यपदार्थ प्रामुख्याने असतात. त्यातून बऱ्याच चुका होऊ शकतात. 

  1. आवश्यकतेपेक्षा जास्त तेल आणि तुपाचा उपयोग
  2. जास्त साखरेचं सेवन
  3. शरिरीक हालचाल कमी असणे
  4. रात्री उशीरा जेवण करणं
  5. फास्ट फूडवर अवलंबून राहणं
  6. नाश्ता न करणं


 

Topics mentioned in this article