जाहिरात

Dark Circles Home Remedy: डोळ्यांखालील डार्क सर्कल काही दिवसांत गायब, घरच्या घरी तयार करा नॅचरल आय क्रीम

Dark Circles Home Remedy: डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची गरज नाही. बटाट्याचा रस, व्हिटॅमिन इ, ऑलिव्ह ऑइल आणि अ‍ॅलोवेरा वापरून घरीच सोप्या पद्धतीने आय क्रीम बनवा.

Dark Circles Home Remedy: डोळ्यांखालील डार्क सर्कल  काही दिवसांत गायब, घरच्या घरी तयार करा नॅचरल आय क्रीम
"Dark Circles Home Remedy: डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय"

How To Remove Dark Circles: रात्री उशीरापर्यंत जागे राहणे, सतत स्क्रीन पाहणे, ताणतणाव, अपुरी झोप आणि वाढते वय अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल दिसू लागतात. डार्क सर्कल लपवण्यासाठी लोक महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात, पण अनेकदा घरात असलेल्या वस्तूंचा वापर करूनही सोपे उपाय केले जाऊ शकतात. जर तुम्हाला केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी घरगुती उपाय करून पाहायचा असेल, तर तुम्ही बटाट्याचा रस, व्हिटॅमिन इ कॅप्सुल, ऑलिव्ह ऑइल आणि कोरफडीचा गर वापरून 'आय क्रीम' (Eye Cream) तयार करू शकता. ही क्रीम तयार करणे सोपे आहे आणि योग्य प्रकारे स्टोअर केल्यास साधारण सात ते आठ दिवसांपर्यंत वापरता येऊ शकते.

घरच्या घरी कशी तयार करावी आय क्रीम?

आय क्रीम तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • बटाट्याचा ताजा रस: एक मोठा चमचा
  • व्हिटॅमिन इ कॅप्सूल: एक
  • ऑलिव्ह ऑइल: एक लहान चमचा
  • कोरफडीचा गर (अ‍ॅलोवेरा जेल): एक मोठा चमचा

कृती:

  • सर्वात आधी बटाटा किसून त्याचा ताजा रस काढून घ्या.
  • आता एका स्वच्छ वाटीमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेल घ्या.
  • त्यात ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन इ कॅप्सुलमधील तेल मिसळा.
  • शेवटी बटाट्याचा रस घालून सर्व सामग्री चांगली फेटून घ्या. 
  • तयार झालेली क्रीम एका स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

क्रीमचा वापर कसा करावा?

रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर डोळ्यांखाली थोडीशी क्रीम लावा. एक ते दोन मिनिटे मसाज करा आणि क्रीम रात्रभर तशीच राहू द्या. सकाळी पाण्याने चेहरा धुवून घ्या. क्रीम नियमित वापरल्यास त्वचेला ओलावा (मॉइश्चर) मिळू शकतो. 

(नक्की वाचा: Hair Growth Tips: केसांची वाढ होत नाहीय? तुमच्या शरीरात असू शकते 'या' 3 व्हिटॅमिन्सची भयंकर कमतरता, डॉ. सेठींनी सांगितले सत्य)

किती दिवसांपर्यंत क्रीम टिकेल? 

या क्रीममध्ये ताज्या बटाट्याचा रस वापरला जातो आणि यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह (टिकाऊ रसायने) नसतात, त्यामुळे ही क्रीम नेहमी फ्रिजमध्येच ठेवा. 7 ते 8 दिवसांच्या आतमध्ये क्रीम वापरावी.  

आय क्रीम वापरताना कोणती काळजी घ्यावी  

  • क्रीम काढण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करा, जेणेकरून त्यात बॅक्टेरिया होणार नाहीत. 
  • क्रीम फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे खराब होणार नाही. 
  • क्रीम लावल्यानंतर त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी जाणवल्यास क्रीम वापरणे टाळावे. पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. 

NOTE: जर डार्क सर्कल्स खूप काळापासून असतील किंवा त्यामागे काही आरोग्यविषयक कारण असतील तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी त्वचाविकार तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घेणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com