Dmart Story: डीमार्ट खरंच दाऊदचं आहे का? D-चा अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

दाऊदची डीमार्टमध्ये मोठी गुंतवणूक आहे अशाही चर्चा नेहमी होतात. मात्र खरंच डीमार्ट दाऊदच्या मालकीचं आहे का? डीमार्ट आणि दाऊदचे काही कनेक्शन आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins

Dmart And Dawood Ibrahim Connection:  डी-मार्ट या सुपरमार्केटची विशेष ओळख करुन देण्याची काहीही गरज नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात एकाच छताखाली किराणा आणि घरगुती वस्तू उपलब्ध करून देणारी डीमार्ट (DMart) ही देशातील अत्यंत लोकप्रिय सुपरमार्केट साखळी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये या ब्रँडची लोकप्रियता प्रचंड आहे. डीमार्टबाबत आजपर्यंत अनेक चर्चाही ऐकायला मिळतात.

MSRTC News: कोकणातून थेट स्वामींच्या दर्शनाला! नवीन बस सुरु; कुठून निघणार, कुठे कुठे थांबणार? वाचा एका क्लिकवर

डी-मार्ट खरचं दाऊदचे आहे का? 

या चर्चांमध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा दावा म्हणजे  डीमार्ट हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालकीचे आहे. त्याच्याच नावावरुन डीमार्ट म्हणजेच दाऊद मार्ट असं त्याचे नाव पडले. दाऊद दुबईतून डीमार्ट चालवतो असंही बोलले जाते. दाऊदची डीमार्टमध्ये मोठी गुंतवणूक आहे अशाही चर्चा नेहमी होतात. मात्र खरंच डीमार्ट दाऊदच्या मालकीचं आहे का? डीमार्ट आणि दाऊदचे काही कनेक्शन आहे का? जाणून यामागचे सत्य...

Advertisement

वास्तविक पाहता, डीमार्टचा अंडरवर्ल्डशी आणि दहशतवादी दाऊदशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. डीमार्टची स्थापना २००२ मध्ये झाली असून ही रिटेल साखळी 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड' (Avenue Supermarts Ltd.) या कंपनीच्या अंतर्गत चालवली जाते. या कंपनीची स्थापना प्रसिद्ध उद्योजक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani)  यांनी केली आहे. डीमार्टच्या नावातील 'डी' (D) हे अक्षर कोणत्याही दाऊदवरून नाही, तर संस्थापक राधाकिशन 'दमानी' यांच्या आडनावावरून ठेवण्यात आले आहे. D म्हणजे दमानी यावरुनच त्याचे नाव दमानी मार्ट असं ठेवण्यात आले. 

डीमार्टमध्ये स्वस्तात वस्तू कशा मिळतात? 

डी-मार्ट मधल्या मध्यस्थांना वगळून थेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो. यामुळे कंपन्या त्यांना MRP पेक्षा खूप कमी दरात माल देतात.  बरीच डी-मार्ट स्टोअर्स ही स्वतःच्या जागेत किंवा अत्यंत कमी भाड्याच्या दीर्घकालीन करारावर असतात. त्यामुळे त्यांना इतर मॉल्ससारखा भरमसाठ भाड्याचा खर्च करावा लागत नाही. डी-मार्ट आपल्या पुरवठादारांना (Suppliers) खूप लवकर किंवा रोखीने पैसे देतो. यामुळे कंपन्या त्यांना अतिरिक्त डिस्काउंट देतात, ज्याचा फायदा ग्राहकांना मिळतो.

VIDEO: "मम्मी बियर पिणार का?" लेकीचा प्रश्न, पुढं आईने शांतपणे जे केलं... दक्ष पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहाच