जाहिरात

MSRTC News: कोकणातून थेट स्वामींच्या दर्शनाला! नवीन बस सुरु; कुठून निघणार, कुठे कुठे थांबणार? वाचा एका क्लिकवर

महत्त्वाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली असून, त्यांना आता कोणत्याही त्रासाशिवाय थेट अक्कलकोट गाठता येणार आहे.

MSRTC News: कोकणातून थेट स्वामींच्या दर्शनाला! नवीन बस सुरु; कुठून निघणार, कुठे कुठे थांबणार? वाचा एका क्लिकवर

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग:

Malvan To Akkalkot Bus: कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालवण आगारातून आता थेट अक्कलकोटसाठी नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली असून, त्यांना आता कोणत्याही त्रासाशिवाय थेट अक्कलकोट गाठता येणार आहे. यापूर्वी प्रवाशांना अक्कलकोटला जाण्यासाठी वाटेत गाड्या बदलाव्या लागत होत्या, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होते. मात्र, आता या थेट बससेवेमुळे भक्तांचा प्रवास अत्यंत सुकर आणि आरामदायी होणार आहे.

VIDEO: "मम्मी बियर पिणार का?" लेकीचा प्रश्न, पुढं आईने शांतपणे जे केलं... दक्ष पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहाच

कोकणातून थेट स्वामींच्या दर्शनाला! 

​मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन बस दररोज दुपारी ३:४५ वाजता मालवण आगारातून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. तर परतीच्या प्रवासासाठी ही बस अक्कलकोट येथून सायंकाळी ७:३० वाजता मालवणकडे निघेल. हा प्रवास अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रवाशांना सोयीचा ठरावा यासाठी महामंडळाने या मार्गावरील प्रमुख शहरांचा समावेश केला आहे. मालवणहून निघालेली ही बस आचरा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर या महत्त्वाच्या मार्गावरून आणि स्थानकांवरून धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील इतर प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

​प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून एसटी महामंडळाने या बससेवेसाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता घरबसल्या आपल्या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध सवलत योजनांचा लाभ या प्रवाशांना मिळणार आहे. त्यानुसार, महिला प्रवाशांना एसटीच्या प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

 तर ७५ वर्षांवरील जेष्ठा नागरिकांना पूर्णपणे मोफत म्हणजेच १०० टक्के प्रवास सवलत लागू असणार आहे. दरम्यान, या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या बससेवेमुळे सिंधुदुर्ग ते सोलापूर आणि अक्कलकोट दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान झाला आहे.

Schemes for Girls: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित! 5 जबरदस्त सरकारी योजना; कसा होतो फायदा? वाचा..

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com