जाहिरात

VIDEO: "मम्मी बियर पिणार का?" लेकीचा प्रश्न, पुढं आईने शांतपणे जे केलं... दक्ष पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहाच

दारूसारख्या सवयींचा मुलांच्या आरोग्यावर, सामाजिक जीवनावर आणि वैयक्तिक निर्णयांवर कसा परिणाम होऊ शकतो, हे पालक मुलांना समजावून सांगू शकतात.

VIDEO: "मम्मी बियर पिणार का?" लेकीचा प्रश्न, पुढं आईने शांतपणे जे केलं... दक्ष पालकांनी 'हा' व्हिडिओ पाहाच

Parental Tips Viral Video:  मुले कधीकधी आपल्या पालकांना असे प्रश्न विचारतात ज्यांची त्यांनी कधी अपेक्षाही केलेली नसते. जेव्हा मुलांकडून असा प्रश्न केला जातो, तेव्हा पालकांचे उत्तरही ऐकण्यासारखे असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. डिजिटल क्रिएटर पावनी अवस्थीने आपल्या आईला बियर पिणार का? असं विचारले ज्यानंतर आईने दिलेल्या उत्तराने तिची बोलतीच बंद केली. या व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या आईची आठवण झाली.

Liquor Ban: मद्यप्रेमींना धक्का, दारु मिळणारच नाही! Old Monk, RCसह ‘या' ब्रँड्सवर बंदी, धक्कादायक कारण...

बियरवरुन माय-लेकीत जुंपली.. 

व्हिडिओमध्ये डिजिटल क्रिएटर पावनी अवस्थी आपल्या आईशी चर्चा करत आहे ती म्हणते की, आजकाल काही पालक आपल्या मुलांसोबत बिअर पितात. हे ऐकून आई म्हणते धन्य आहेत ते पालक! आत्ताच मी खाली एका मुलाने लावलेलं गाण ऐकलं "चार बोटल वोडका, काम मेरा रोजका". त्यावर मुलगी म्हणते तू ते गाणं ऐकलं नाही का? तु हनी सिंगच्या गाण्याबद्दल काही बोलू शकत नाही" हे ऐकून आई म्हणते हनी सिंगच्या गाण्याबद्दल काहीही बोलत नाही आहोत. पण हे सगळं आवडत नाही". त्यावर त्या मुलाची बाजू घेत मुलगी म्हणते की तो प्रामाणिक माणूस आहे जो हे उघडपणे सांगत आहे

यावर आई लगेच उत्तर देते, "प्रामाणिक? जर एखादा मुलगा म्हणाला की तो दारू पितो, तर कोणी आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून देईल का? कोणीच देणार नाही. कोणीही लवकर मागणी घालणार नाही." मग तिची मुलगी पावनी म्हणते, "मग आपण त्याच्याकडे जाऊ." हे ऐकून आई उत्तर देते, "तू तर कमाल आहेस. तुला तुझ्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी आवडतात."

आई बियर पिणार का? 

पावनी स्पष्ट करते, "मी असं म्हणत नाहीये की चुकीच्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की जे दारू पितात ते सगळेच चुकीचे आहेत. ते चुकीचे नसतात." हो, काही लोक जे जास्त पितात ते चुकीचे असतात. पण जो कधीतरी पितो त्याच्याशी तुम्ही असं बोलू शकत नाही.' आई रागाने विचारते, 'पण तुला दारूचं इतकं वेड का लागलंय? आम्ही काही बोलत नव्हतो. तू कोण आहेस ढवळाढवळ करणारी? मूर्ख कुठली!' मग, पावनी हसून विचारते, 'तु बिअर पिणार का?' हे ऐकून आई रागाने म्हणते, 'जर तू मला असाच त्रास देत राहिलीस, तर तुला समजेल.'

पालकांसाठी मोलाचा संदेश! 

या व्हिडिओमध्ये, पवनी आणि तिच्या आईमध्ये एक हलकाफुलका संवाद होतो, ज्यामध्ये तिच्या दारू पिण्याच्या सवयीचाही उल्लेख आहे. तथापि अशा संवेदनशील विषयांवर कुटुंबात मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. दारूसारख्या सवयींचा मुलांच्या आरोग्यावर, सामाजिक जीवनावर आणि वैयक्तिक निर्णयांवर कसा परिणाम होऊ शकतो, हे पालक मुलांना समजावून सांगू शकतात. जेव्हा मुलांना एखाद्या गोष्टीमागील कारणे समजतात, तेव्हा ते केवळ भीती किंवा दबावापोटी नव्हे, तर विचारपूर्वक चांगले निर्णय घ्यायला शिकतात.

Schemes for Girls: लाडक्या लेकीचं भविष्य करा सुरक्षित! 5 जबरदस्त सरकारी योजना; कसा होतो फायदा? वाचा..

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com