Hair Growth Tips: केसांची वाढ भराभर कशामुळे होईल,आवळा की अ‍ॅलोव्हेरा? घनदाट आणि लांबसडक केसांसाठी काय वापरावे

Amla Vs Aloe Vera For Hair Growth: लांबसडक आणि घनदाट केस हवे आहेत का, तर मग आवळा आणि अ‍ॅलोव्हेरा कसा वापर करावा, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Amla Vs Aloe Vera For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी कोणत्या गोष्टींचा ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश करावा?"
Canva

Amla Vs Aloe Vera For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी महागडे प्रोडक्ट वापरुन देखील काहीही फायदा झाला नाही? केसांसाठी तुम्हीही नैसर्गिक औषधोपचार करण्याचा विचार करताय? तर आवळा आणि अ‍ॅलोव्हेराचा ब्युटी केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात; जाणून घेऊया सविस्तर माहिती.. 

केसांसाठी आवळा वापरण्याचे फायदे | Amla For Hair Growth 

  • आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, लोह आणि केसांसाठी उपयुक्त असणाऱ्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.   
  • केसगळती कमी होऊन स्कॅल्पच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. 
  • आवळ्याचे तेल, आवळा पावडर तुम्ही केसांसाठी वापरू शकता तसेच आवळ्याचा ज्युस देखील पिऊ शकता. 

केसांसाठी अ‍ॅलोव्हेरा वापरण्याचे फायदे | Aloe Vera For Hair Growth 

अ‍ॅलोव्हेरामुळे स्कॅल्पला थंडावा मिळतो. यातील व्हिटॅमिन आणि एंझाइम्समुळे केसांचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते. अ‍ॅलोव्हेरामुळे केसांसह स्कॅल्प हायड्रेट राहते. 

आवळा की अ‍ॅलोव्हेरा, केसांसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?

  • आवळा आणि अ‍ॅलोव्हेरा दोन्ही गोष्टींमुळे केसांना वेगवेगळे फायदे मिळतात. 
  • आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे केस मजबूत, घनदाट होण्यास मदत मिळते तसंच केसगळतीची समस्याही कमी होते. 
  • अ‍ॅलोव्हेरामुळे स्कॅल्पचा भाग स्वच्छ आणि थंड राहतो. नवीन केस येण्यासही मदत मिळते. 
  • केस पातळ होणे, केस गळणे यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास आवळ्याचा वापर करावा. 
  • स्कॅल्पला खाज येणे, कोंडा होणे यासारख्या समस्यांवर अ‍ॅलोव्हेरा वापरणं रामबाण उपाय ठरू शकतो.  

(नक्की वाचा: Hair Growth Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केसांची वाढ थांबते? न्युट्रिशनिस्टने 5 ब्लड टेस्ट करण्याचा दिला सल्ला)

आवळा आणि अ‍ॅलोव्हेराचा कसा करावा वापर?

  • आठवड्यातून एक किंवा दोन वेळा आवळ्याच्या तेलाचा केसांसाठी वापर करावा. 
  • आवळ्याचे तेल हलकेसे गरम करा. स्कॅल्पसह केसांचा मसाज करावा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुऊन घ्यावे. 
  • आवळा पावडर आणि दही एकत्रित करून हेअरमास्कही वापरू शकता.  
  • घरामध्ये अ‍ॅलोव्हेराचे रोप असेल तर त्यातील एक ताजे पान काढा. ते मधोमध कापा, त्यातील गर काढून मिक्सरच्या भांड्यात वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही केसांवर लावू शकता. 
  • अ‍ॅलोव्हेरा आणि आवळा पावडर किंवा ज्युस एकत्रित करूनही पेस्ट केसांसाठी वापरू शकता. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)