
Hair Growth Tips: लांबसडक, घनदाट केसांसाठी लोक कित्येक प्रकारचे उपाय करतात. नैसर्गिक, आयुर्वेदिक औषधोपचारांपासून ते ब्युटी पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटपर्यंत अगदी सर्व उपाय महिला तसेच पुरुषही करतात. इतके उपाय केल्यानंतरही केसांची वाढ होत नाही. तर मंडळींनो केसांसाठी बाहेरुन उपाय करण्याऐवजी शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करा. कारण हे कदाचित पोषकघटकांच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
न्युट्रिशनिस्टने नेमके काय सांगितले?
न्युट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, तुमचे केस ठराविक एकाच लांबीपर्यंत वाढत असतील, तर शरीरातील दोन व्हिटॅमिन्सची कमतरता यासाठी कारणीभूत ठरू शकते. व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे थेट केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतात.
व्हिटॅमिन D3
न्युट्रिशनिस्टच्या माहितीनुसार, शरीरामध्ये व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होतात, म्हणजे केसांची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते आणि केसगळतीची समस्या वाढते. व्हिटॅमिन D3मुळे केसांचे मूळ मजबूत होतात तसेच नवीन केस येण्यासही मदत मिळते.
व्हिटॅमिन B12
व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे केसांची वाढ खुंटते, कारण व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये ऑक्सिजन आणि पोषणतत्त्व स्कॅल्पपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे स्कॅल्पला पोषणतत्त्वांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतात, तसेच केस कमकुवत, कोरडे आणि पातळही होतात.
या गोष्टींचीही काळजी घ्यावी
व्हिटॅमिन्सव्यतिरिक्त शरीरातील लोहाची कमतरता, थायरॉयडची समस्या आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही केसगळती तसेच केसांची वाढ थांबणे या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर केसगळतीची समस्या वाढेल कारण केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह कमी होऊन जातो.
केसांच्या वाढीसाठी काय उपाय करावा?
लीमा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केसांची वाढ थांबली असेल, केस गळत असतील तर यामागील कारण जाणून घेण्यासाठी पाच ब्लड टेस्ट कराव्या.
- व्हिटॅमिन D3
- व्हिटॅमिन B12
- लोह
- थायरॉयड प्रोफाइल (TSH, T3, T4)
- हार्मोनल पॅनल (विशेषतः DHT पातळी)
या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर पोषक घटकांच्या कमतरता आढळल्यास डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world